धुळ्यात शंभर टक्के लॉकडाउन, कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 12:56 IST2020-04-11T12:55:55+5:302020-04-11T12:56:20+5:30

पोलीस चौका-चौकात तैनात : नागरिक स्वयंस्फुर्त थांबले घरात

One hundred percent lockdown in dust, tightly closed | धुळ्यात शंभर टक्के लॉकडाउन, कडकडीत बंद

धुळ्यात शंभर टक्के लॉकडाउन, कडकडीत बंद

धुळे : कोरोनाच्या अनुषंगाने धुळे शहरासह जिल्ह्यात दीड दिवसांसाठी संचारबंदी लावण्यात आलेली आहे़ त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरीकांनी दिला़ रस्त्यावर कोणीही दिसून आले़ त्यामुळे रस्ते निर्मनुष्य दिसून आले़ दरम्यान, पोलिांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे़
‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी धुळे जिल्ह्यात शुक्रवार १० एप्रिल २०२० रोजीच्या रात्री १२ वाजेपासून ते रविवार १२ एप्रिल २०२० रोजीच्या पहाटे ५ वाजेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाउन’ (संचारबंदी) प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी लावली असू त्याबाबत आदेश देखील काढण्यात आला़ या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम १४४ (१) (३) अन्वये आदेश पारीत झाला आहे़ रस्त्यावर कोणीही नसल्याने शुकशुकाट पसरला आहे़

Web Title: One hundred percent lockdown in dust, tightly closed

टॅग्स :Dhuleधुळे