शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधितांमध्ये लक्षणे नसलेली रुग्णांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST

जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सर्वाधित ८ हजार २८२ कोरोना बाधित रुग्ण महानगरात ...

जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सर्वाधित ८ हजार २८२ कोरोना बाधित रुग्ण महानगरात आढळून आलेले आहेत. त्यापैकी ४ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, महानगरातील २१८ जणांना आतापर्यंत सहा महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ५ हजार ५४९ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये जिल्ह्याबाहेरील १३५ रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी १० हजार १० रुग्णांना होम क्वारंन्टाईन करण्यात आलेले आहेत. दरम्यान, बाधित रुग्णांमध्ये साैम्य प्रकारची लक्षणे असलेली रुग्णांची संख्या ३५० आहे. महानगरातील पाॅझिटिव्हिटी रेट हा ७० टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने रविवारी वगळता अन्य दिवशी दररोज बाधितांची सरासरी ३०० ते ४०० अहवाल तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात नोंव्हेबर महिन्यात जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे दिवसभरात सरासरी १ ते ५ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह येत होते. बाधितांची संख्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नियंत्रणात होती. त्यामुळे कोरोना संपला असे वाटत होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा बाधितांची शंभरीपार केली होती. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होतो. रुग्ण संख्या सर्वाधिक

मात्र कंटेनमेन्ट झोन नाही

महानगरासह चार ही तालुक्यात काेरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असले तरी महानगरात एकाही ठिकाणी कंटेनमेन्ट झोन दिसून येत नाही. सध्या कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर मनपा आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरात सॅनिटराझर केले जात आहे.

साैम्य लक्षणांचे कारणे

सध्या हवामान बदलामुळे सर्दी, खाेकला, ताप, अंगदुखी अशा प्रकारचे व्याधी सध्या नागरिकांमध्ये दिसून येत आहे. औषधी विक्रेत्यांकडून कोणत्या तरी गोळ्या घ्यायच्या आणि अंगावर काढायचे याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कोरोना तपासणी केली जात नाही. काेराेना तपासणी केल्यावर अहवाल पाॅझिटिव्ह येणार अशी मानसिकता सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग दिवसेेंदिवस वाढत आहे.