शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एनएसयूआय कार्यकर्त्यांनी कोरोनाग्रस्तांची मदत करावी : आ. कुणाल पाटील धुळ्यात एनएसयूआयची राज्स्तरीय ऑनलाईन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST

महाराष्ट्रातील एनएसयूआय विद्यार्थी संघटना तसेच प्रत्येक जिल्ह्यातील युवक काँग्रेसची संघटनात्मक बांधणीची जबाबदारी पक्षातर्फे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील ...

महाराष्ट्रातील एनएसयूआय विद्यार्थी संघटना तसेच प्रत्येक जिल्ह्यातील युवक काँग्रेसची संघटनात्मक बांधणीची जबाबदारी पक्षातर्फे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी राज्यातील एनएसयूआयचे सर्व जिल्हाध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत प्रत्येक जिल्हाध्यक्षांचा जिल्हानिहाय संघटनात्मक कामाचा तसेच कोरोना महामारीत कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी एनएसयूआयची शाखा असावी. या कामासाठी पक्षातर्फे विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भक्कम पाठबळ दिले जाईल. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पक्षाच्या पातळीवर विचार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल. देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे म्हणून काँग्रेसच्या आणि एनएसयूआयच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी स्वरक्षणासह जनतेच्या रक्षणाचे काम करावे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, एनएसयूआय म्हणजे उद्याचे भविष्य आहे. कोरोना काळात एनएसयूआयच्या कार्याची दखल घेतली जाईल. गेल्या सात वर्षांत देश ४५ वर्षे मागे गेला आहे. भाजपने सगळ्याच क्षेत्रांचे खासगीकरण करत मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण करून तरुणांचे भविष्य अंधकारमय केले आहे. एनएसयूआयने कोरोना काळात समाजाची मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला राज्यातील विविध जिल्ह्यांतून २३ जिल्हाध्यक्षांसह ५० पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. बैठकीत एनएसयूआयचे प्रदेश अध्यक्ष अमीर शेख, प्रदेश सचिव मोहम्मद शयान उस्मान, आदी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक अमीर शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन करून आभार अभिजित हलदेकर यांनी मानले.