शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

आता सारी, डेंग्यू आजारानेही डोके वर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 11:31 IST

भूषण चिंचोरे-  जिल्हयात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोना पूर्णपणे हद्दपार झालेला नसताना जिल्ह्यात सारी व डेंग्यू आजाराने डोके ...

भूषण चिंचोरे- जिल्हयात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोना पूर्णपणे हद्दपार झालेला नसताना जिल्ह्यात सारी व डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे २१ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात सर्वात जास्त रुग्ण आढळले असून प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोधमोहिमेला देखील सुरुवात झाली आहे. १६ डिसेंबर पर्यंत हि मोहीम चालणार आहे. अशा विविध पातळीवर आरोग्य यंत्रणेची कसरत सुरु झाली आहे.जिल्ह्यात कोरोना सोबतच सारीचेही रुग्ण आढळत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सारी हा आजार श्वसनसंस्थेशी संबंधित आहे. कोरोना व सारी दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत.भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड विभागात सारीच्या रुग्णांवर देखील उपचार सुरु आहेत. कोविड विभागात एकूण ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.त्यात, १३ कोरोनाबाधित व २७ सारीचे रुग्ण आहेत. तर ७ संशयित रुग्ण असून त्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. सारी आजाराची लक्षणे कोरोनासारखीच असल्यामुळे सारीच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात येते.कोरोना व सारी दोन्हीही आजारांमध्ये शास घ्यायला त्रास होत असतो. त्यामुळे कोरोना सारखीच लक्षणे असलेल्या रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येतो. व त्या रुग्णाच्या चिंतेत आणखी भर पडते. असा रुग्ण सारी या आजाराचा असू शकतो.त्यामुळे लक्षणे दिसत असतील तर लवकर कोरोनाची चाचणी करून घ्यावी.दरम्यान, डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत केवळ ३ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात २१ रुग्णांची भर पडली आहे. यावर्षी आतापर्यंत, २०० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. जून महिन्याचा अपवाद वगळता सप्टेंबर महिन्यापर्यंत डेंग्यूचे रुग्ण आढळले नव्हते. मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. जून महिन्यात तीन रुग्ण आढळले होते तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात एकूण २१ रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे एकूण २४ रुग्णांची यंदा नोंद झाली आहे.सुदैवाने एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी आढळलेल्या २४ रुग्णांपैकी १६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.तर शहरी भागात ८ रुग्ण आढळले आहेत. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आढळलेल्या २१ रुग्णांपैकी १३ रुग्ण ग्रामीण भागातील तर ८ रुग्ण शहरातील आहेत. ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे.