शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आता खऱ्या अर्थाने शैक्षणिक वर्षाची झाली सुुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी परीक्षा कुठे झाल्या, अन‌् निकाल कुठे लागले याचा फारसा गवगवा झालाच नाही. जून महिन्यापासून नियमित शैक्षणिक ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी परीक्षा कुठे झाल्या, अन‌् निकाल कुठे लागले याचा फारसा गवगवा झालाच नाही. जून महिन्यापासून नियमित शैक्षणिक वर्ष सुरू झाले नाही. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान नको म्हणून ॲानलाइन शिक्षण सुरू झाले. मात्र ते किती मुलांना मिळाले, किती जणांना समजले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. शासकीय आकडे मोठे दिसत असली तरी त्यातही तफावत होती.

दरम्यान वरिष्ठ महाविद्यालये अगोदर सुरू करून नंतर प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू करणे गरजेचे होते. मात्र शिक्षण विभागाने येथेही आपली ‘कार्यपद्धती’कशी आहे, हे दाखवून दिले. अगोदर नववी ते १२वीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या. यात कोणीही बाधित न आढळल्याने, दीड महिन्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. या ठिकाणीही एकही विद्यार्थ्याला संसर्ग झाला नसल्याने, आता वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही, असे समजून शिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास हिरवी झेंडी दाखवली आहे.

वास्तविक गेल्या दीड महिन्यापूर्वीच वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली असती, तर आतापर्यंत त्यांचा बराच अभ्यासक्रम झाला असता, प्रॅक्टिकल्सही झाले असते. मात्र तसे न करता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्वात शेवटी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे गुपित अजूनही उलगडले नाही. असो आता वरिष्ठ महाविद्यालये सुरू होत आहे, ही समाधानाची बाब आहे.

दरम्यान आता महाविद्यालये सुरू होणार असल्याने, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण वरिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षाही भरउन्हाळ्यात म्हणजे एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता असून, त्यासाठी आता तीन ते साडेतीन महिन्याचाच कालावधी हाती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तासिका घेऊन शिक्षकांनाही अभ्यासक्रम, प्रॅक्टिकल्स करून घेणे गरजेचे ठरणार आहे. विद्यार्थी सज्ञान असल्याने, दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनाचे नियमांचेही पालन होणे गरजेचे आहे.