विहिरीत पडून माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; जेसीबीने बाहेर काढले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 16:22 IST2022-05-14T16:19:08+5:302022-05-14T16:22:02+5:30

36 वर्षीय सुनीता भिका पवार आणि 10 वर्षीय शाम भिका पवार या मायलेकाचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला

My-Lake's unfortunate death after falling into a well; JCB exhumed the bodies | विहिरीत पडून माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; जेसीबीने बाहेर काढले मृतदेह

विहिरीत पडून माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; जेसीबीने बाहेर काढले मृतदेह

धुळे - तालुक्यातील मोरशेवडी येथे विहिरीचा भाग कोसळून आईसह 10 वर्षीय मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये भिका पवार यांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विहिरीतून आई-मुलाचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांच्या काळजात धस्स केलं. जेसीबीच्या सहाय्याने हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

36 वर्षीय सुनीता भिका पवार आणि 10 वर्षीय शाम भिका पवार या मायलेकाचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. अखेर, दोघांचा मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आला. या घटनेत भिका पवार यांना वाचवण्यात यश आले आहे. आपल्या शेतातील विहिरीच्या आजुबाजूला बांधण्यात आलेल्या कठड्याला पाणी मारण्यासाठी ते गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: My-Lake's unfortunate death after falling into a well; JCB exhumed the bodies