प्रशासनातर्फे लाखापेक्षा अधिक पासेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 09:40 PM2020-08-06T21:40:18+5:302020-08-06T21:40:38+5:30

प्रवासाची परवानगी : सर्वाधिक पासेस रुग्णांना अन् अडकलेल्या मजुरांना

More than one lakh passes by the administration | प्रशासनातर्फे लाखापेक्षा अधिक पासेस

dhule

Next

धुळे : कोरोना संसर्गाच्या काळात अत्यावश्यक कामांसाठी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक प्रवासी पासेस अदा केल्या आहेत़ त्यात रुग्णांचा आणि अडकलेल्या मजुरांचा सर्वाधिक समावेश आहे़
देशात आणि राज्यात २५ मार्चपासून लॉकडाऊन झाल्यानंतर शासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली़ लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार ठप्प झाल्याने कामगार बेरोजगार झाले़ अनेक स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि प्रवासी अडकले़ या सर्व घटकांना आपल्या मुळ राज्यात, जिल्ह्यात परत जाण्यासाठी शासनाच्या आदेशानंतर प्रवासी पासेस देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले़ याशिवाय अंत्यविधी आणि दूर्धर आजारांवर उपचारासाठी मोठ्या शहरातील दवाखान्यांमध्ये जाण्यास अत्यावश्यक सेवा म्हणून परवागनी देण्याचे कामही सुरू झाले़ जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत लाखापेक्षा अधिक प्रवासी पासेस अदा करुन लाखो नागरीकांना प्रवासाची परवागनी दिली आहे़ एका पासेसवर संपूर्ण कुटूंब प्रवास करीत असल्याने पासेस जरी कमी असल्या तरी प्रवास करणाऱ्यांची संख्या मात्र मोठी आहे़ त्याचा नेमका आकडा मात्र सांगता येत नाही़
धुळे जिल्ह्यातून कोकण, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी महानगरांमध्ये जाण्याची परवानगी देण्यासाठी प्रवासी पासेस अदा करण्याची जबाबदारी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांच्यावर सोपविली होती़ त्यांनी आतापर्यंत २५ ते ३० हजार पासेस अदा केल्या आहेत़ महानगरांमधील मोठ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या त्यात सर्वाधिक असल्याचे भामरे यांनी सांगितले़
मराठवाडा आणि विदर्भाची जबाबदारी रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर सोपविली होती़ त्यांनी आतापर्यंत पाच हजारापेक्षा अधिक पासेस अदा केल्या आहेत़ आजारपण, लग्नसमारंभ आणि अंत्यविधी आदी अत्यावश्यक कामांसाठी प्रवासी पासेस अदा केल्याची त्यांनी सांगितले़
तसेच पुणे आणि नाशिक या दोन विभागातील ११ जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी प्रवासी पासेस अदा करण्याची जबाबदारी भूसंपादन उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण यांच्यावर सोपविली होती़ या कामात त्यांना तहसिलदार सुचेता चव्हाण यांनी देखील सहाकर्य केले़ या दोन विभागांसाठी त्यांनी आतापर्यंत १९ हजारापेक्षा अधिक पासेसचे वितरण करुन प्रवासाची परवानगी दिली आहे़
धुळे जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना आपल्या मुळ राज्यात परत जाता यावे यासाठी प्रवासी पास देण्याची जबादारी जिल्हा पूनर्वसन अधिकारी प्रज्ञा बडे-मिसाळ यांच्यावर सोपविली होती़ त्यांनी आतापर्यंत असंख्य स्थलांतरीत कामगारांना प्रवासी पासेस अदा केल्या असून तहसिलदारांच्या मदतीने वाहनांची आणि भोजनाची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे़
अत्यावश्यक सेवेचा अनेकांनी केला फंडा
उपचार, अंत्यविधी, लग्नसमारंभ या अत्यावश्यक कामांचा फंडा वापरुन अनेकांनी प्रवसी पासेस मिळविल्याची चर्चा आहे़ परंतु, कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक परिस्थिती नसल्याने अनावश्यक प्रवास कुणी करणार नाही, अशी सकारात्मक प्रतिक्रिया पासेस अदा करणाºया अधिकाºयांनी दिली़

Web Title: More than one lakh passes by the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे