शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांपुढे महापालिका हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 11:20 IST

महापालिका : कुत्र्यांच्या झुंडींचा सुळसुळाट; उपाययोजना होत नसल्याने नाराजी

ठळक मुद्देसंख्या वाढीचे कारणेभटकी कुत्री पकडण्यास प्राणीमित्रांचा विरोधएक मादी सात ते आठ पिलांना जन्म देतेकुत्रे पकडणाºया वाहनाचा वास येतो, म्हणून कुत्रे पळून जातात़पकडण्याची प्रक्रिया   नागरिकांच्या तक्रारीनंतर कुत्रे पकडणेगळ्यात पट्टा नसलेले कुत्रे पकडणे कुत्र्याच्या कानाला खूण केलेली असल्यास निर्बीजीकरण झालेले कुत्रे पकडत नाही़ निर्बीजीकरणानंतर कुत्र्यांना पुन्हा सोडण्यात येते़निर्णय विचाराधीन  भटके कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून श्वान निबीर्जीकरण करण्याचा निर्णय विचाराधीन आहे़ - आर्थिक खर्च अधिक असल्याने अडचण असल्याचे सुत्रांनी सांगितली़

 धुळे :  शहरात गेल्या काही वषार्पासुन भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ मनपाकडे प्रशासनाकडून उपाय-योजना नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे़भटक्या कुत्र्यांचा हा त्रास आता त्यांच्या चाव्यांमुळे तसेच रात्रीच्या वेळी एकटादुकटाच्या अंगावर धावून जाण्यामुळे जीवघेणा ठरू लागल्याने  रात्रीच्या वेळी रस्त्यावरून कामावर येणारे-जाणारे नोकरदारासी बस व रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाºया प्रवाशांना भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला रोज सामोरे जावे लागत आहे़  घरासमोर खेळणा-या लहान मुलांचे लचके तोडण्यापासून रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांवर हल्ले देखील होत आहे़भटक्या कुत्र्यांची दहशत सुरूचभटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवरवर नियंत्रण ठेवण्यात पालिका हतबल होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये पालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे आता भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणा बाहेर गेली आहे. याचाच त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे.  गल्लो-गल्लीत भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे. भटक्या कुत्र्यांचे हल्लेही लोकांवर दिवसेंदिव वाढतच चालले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना रस्त्यावरून चालणे भटक्या कुत्र्यांनी कठीण केले आहे. शहराच्या काही भागात नाक्या-नाक्यावर रात्रीच्या वेळेस चोरांसारखे भटके कुत्रे अगदी टोळीने उभे असतात. दुचाकी आली की त्यांच्या मागे हे कुत्रे एका मागून एक धावू लागतात. यामुळे अपघातही घडले आहेत. श्वान निबीर्जीकरण नाही श्वानांच्या निर्बिजीकरणाचा ठेका २००९-१० या कालावधीत कराड येथील एका संस्थेला देण्यात आला होता़ दहा वर्षात वाढलेल्या श्वानांची संख्या पाहता नसबंदी झालेल्या श्वानांची संख्या अत्यल्प होती़ एक पशुवैद्यक जास्तीत जास्त सात नर व चार माद्यांची शस्त्रक्रिया करू शकतो़ या हिशेबाने २२ श्वानांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया मान्य होऊ शकत नाही, असे लेखापरीक्षक अहवालात नमुद केले़ मनपा श्वान निबीर्जीकरण करण्याची प्रक्रिया बंद झाल्याने कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे़  पाच हजार भटकी कुत्रे निबीर्जीकरणाच्या प्रक्रियेसाठी  अधिक खर्च होतो़ त्यामुळे सध्या पाच हजाराहून अधिक भटके कुत्र्यांची संख्या आहे़ मोहीम नावालाच श्वान निबीर्जीकरणासाठी  महापालिकेकडे स्वंतत्र विभागाची गरज आहे़ मात्र वैद्यकीय अधिकारीसह पारिचारिकांच्या जागा रिक्त आहे. भटक्या कुत्र्यांवर वेळीच निबीर्जीकरणाची शस्त्रक्रिया करता यावी यासाठी श्वानांना पकडण्यासाठी  स्वान वाहने देखील उपलब्ध नाही़ त्यामुळे महापालिकेच्या हद्दीतील कुत्रे पकडण्याची मोहीम फक्त नावालाच आहे़ 

 

टॅग्स :Dhuleधुळे