मोहाडी पोलिसांनी पकडल्या चोरी गेलेल्या दहा दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:17 PM2018-03-24T13:17:39+5:302018-03-24T13:17:39+5:30

२ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल : दोन संशयित अटकेत

Mohali police caught 10 robbers stolen | मोहाडी पोलिसांनी पकडल्या चोरी गेलेल्या दहा दुचाकी

मोहाडी पोलिसांनी पकडल्या चोरी गेलेल्या दहा दुचाकी

Next
ठळक मुद्देमोहाडी पोलिसांची कामगिरीचोरीला गेलेल्या १० दुचाकी हस्तगतटोळीच्या संशयावरुन तपास कामाला गती

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दुचाकीपैकी १० दुचाकी मोहाडी पोलिसांच्या पथकाने जप्त केल्या़ त्याची एकत्रित २ लाख ९५ हजार इतकी होते़ या प्रकरणी संदिप ज्ञानेश्वर पाटील (२०) आणि समाधान अर्जुन पाटील (२२) (दोघे रा़ बिलाडी ता़ धुळे) यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्यासह अन्य उपस्थित होते़ 
धुळे तालुक्यातील अवधान शिवार येथून १३ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजेच्या एमएच ४१ डब्ल्यू २८२६ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली होती़ वाहन चोरीची नोंद १६ मार्च रोजी सायंकाळी मोहाडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, हेड कॉन्स्टेबल रविंद्र दराडे, प्रभाकर ब्राम्हणे, पोलीस कर्मचारी गणेश भामरे, आरीफ पठाण, सखाराम खांडेकर यांनी तपास कामाला गती दिली़ अनेकांची चौकशी देखील केली़ त्यातून धुळे तालुक्यातील बिलाडी येथे राहणारे संदिप ज्ञानेश्वर पाटील (२०) आणि समाधान अर्जुन पाटील (२२) (दोघे रा़ बिलाडी ता़ धुळे) यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ त्यांची चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरल्याबाबतची कबूली दिली़ देवपूर, पश्चिम देवपूर, धुळे शहर आणि आझादनगर येथून दुचाकी चोरली असल्याचे सांगितले़ त्यांनी चोरलेल्या १० दुचाकी देखील काढून दिल्या़ त्यांची एकत्रित किंमत २ लाख ९५ हजार इतकी होते़ 
दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास अजुनही सुरु असल्याने या संशयित आरोपींकडून अजून काही चोरीला गेलेल्या दुचाकी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यांच्या माध्यमातून आंतरजिल्हा टोळी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले़ 
 

Web Title: Mohali police caught 10 robbers stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.