शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मनसेने केले महामार्गावरील खड्डयात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 11:52 IST

राष्टÑीय महामार्गावरील पळासनेर ते धुळे दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडले खड्डे, टोल प्रशासनाला दिले निवेदन

आॅनलाइन लोकमतनरडाणा (जि.धुळे) :पळासनेर ते धुळेपर्यंत असलेल्या राष्टÑीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे असून, पायाभूत सुविधा तसेच दिशादर्शक चिन्ह या संबंधित समस्या निवारण करण्यासाठी मनसेकडून महामार्गावरील खड्डयात वृक्षारोपण करून त्याला हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सोनगीर येथील टोल प्रशासनाला निवेदन देवून सात दिवसाच्या आत रस्ता दुरूस्त करण्याचा इशारा देण्यात आला.राष्टÑीय महामार्गावर असलेल्या शिरपूर -धुळे दरम्यानच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याचे मोठे प्रमाण वाढलेले आहे. अपघातामुळे जीवीतहानी होत असून देखील टोल कंपनी या या गोष्टींवर दुर्लक्ष का करत आह.तसेच या खड्ड्यांमुळे जर अपघात होत असतील याला सर्वस्वी जबाबदार टोल कंपनीला गृहीत धरून व्यवस्थापनावर ३०२चे गुन्हे दाखल करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभारेल.जर कंपनी टोल वसुली करीत आहे. तर वाहनधारकांना दर्जेदार रस्ता देण्याची जबाबदारी टोल कंपनीची आहे.नियमानुसार रस्ते खड्डेमुक्त असणे गरजेचे आहे, तरच टोल वसुली केली जाईल असा नियम असतांना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.जर येत्या सात दिवसाच्या आत जर टोल सदरील खड्डे बुजत नसेल तर मनसे सैनिकांकडून ते खड्डे बुजले जातील व टोलला सदर फलक लावले जाईल की ‘रोडवरील खड्डे मनसे कडून बुजविल्यामुळे कोणीही टोल चे पैसे देऊ नयेत’. दरम्यान रस्त्यावर खड्डे असल्याच्या निषेधार्त मनसेतर्फे बाभळे फाटयाजवळ महामार्गावर खड्डयात वृक्षारोपण करण्यात आले.सोनगीर येथे टोल प्रशासनाला निवेदन देतांना मनसेचे तालुकाध्यक्ष बबनराव पाटील, रामकृष्ण पाटील , समाधान पाटील, माधव सिसोदे, नरेश शिसोदे, बाळा पवार, कमलेश शिसोदे, दीपक पाटील, हाबित पहलवान, भटू पाटील, कांतीलाल कोळी, निखिल शिंदे, शाहरुख मिस्तरी ,ओम सिसोदे ,सद्दामला हलवाई, लाला पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे