शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोचे अखेर होणार स्थलांतर, धुळे महापौरांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 05:21 IST

धुळे शहरातील वरखेडी येथील कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरित केला जाणार असून, तसे आदेश मंगळवारी महापौर चंद्रकांत सोनार यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत दिले.

धुळे - शहरातील वरखेडी येथील कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरित केला जाणार असून, तसे आदेश मंगळवारी महापौर चंद्रकांत सोनार यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत दिले. त्यामुळे या डेपोमुळे नागरिकांची मोठ्या त्रासातून सुटका होणार आहे.‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन महापौर सोनार यांनी वरखेडी रस्त्यावरील कचरा डेपो बिलाडी रोडवरील सरकारी जागेवर स्थलांतर करण्याचा हा आदेश दिला.महानगरपालिकेत सकाळी प्रथम महापौर सोनार यांच्या दालनात सकाळी ११ वाजता तातडीची बैठक बोलविण्यात आली.या बैठकीला स्वत: महापौर सोनार, उपायुक्त शांताराम गोसावी, बांधकाम अभियंता कैलास शिंदे, नगरसचिव मनोज वाघ, वरखेडी येथील नगरसेवक शत्रुघ्न भिल, संजय भिल, विजय जाधव, स्वच्छता विभागाचे लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते़वरखेडी कचरा डेपोतील प्रचंड कचरा व दुर्गंधीला वरखेडीसह जुन्या धुळ्यातील नागरिकांना सतत सामोरे जावे लागत होते. यापूर्वी नगरसेवक असताना २०१७ साली महापालिका प्रशासनाकडे हा कचरा डेपो स्थलांतर करण्याची मागणी मीच केली होती, असे महापौरांनी स्पष्ट केले. मात्र मनपाकडे पर्यायी जागा नसल्याने मार्ग निघाला नाही. नंतर मात्र हद्दवाढीतील ११ गावांच्या समावेशामुळे बिलाडी गावातील ३० एकर सरकारी जागेवर वरखेडी कचरा डेपो स्थलांतर करण्याची मागणी केली होती़ या डेपोच्या स्थलांतरामुळे नागरिकांचे सर्व प्रश्न सुटतील, असे बैठकीत सांगून महापौरांनी याबाबत आदेश दिले.राज्य विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु पर्यायी जागाच नसल्याने वरखेडीसह शहरातील नागरिकांना अक्षरश: नरकयातना भोगाव्या लागत होत्या.शासनाकडून निधी उपलब्धहद्दवाढीतील गावांमध्ये कचरा डेपोसाठी पर्यायी जागा मिळाल्याने प्रश्न धसास लागला आहे. घनकचरा संकलन व्यवस्थापनासाठी १८ कोटींचा ठेका नाशिक येथील खाजगी कंपनीस देण्यात आला असून घनकचरा व्यवस्थापनासाठी २५ कोटी रुपयांचा आराखडाही तयार झाला आहे़ कचरा संकलनासोबत त्यावर प्रक्रिया होण्यासाठी बायोमायनिंग व इतर कामांसाठी शासनाकडून ४ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत़ लवकरच कचरा डेपोचे स्थलांतर मार्गी लागणार असल्याचे उपायुक्त शांताराम गोसावी यांनी सांगितले़डेपोच्या आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यातकचरा डेपोला आग लागल्याने अनेक शहरामध्ये दुर्घटना होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ मात्र वरखेडी कचरा डेपोला बाराही महिने आग लागते़ स्थानिक शेतकऱ्यांचा चारा, शेती पिकाचे नुकसान होत़ अधिकाऱ्यांकडून आगीचे कारण एकच सांगितले जाते गॅस तयार होऊन आग लागते़ मात्र ७६ टक्के स्थानिक नागरिक म्हणतात की, कचरा कमी होण्यासाठी डेपोला आग लावली जाते़ व धुराचा त्रास सहन करावा लागतो़ त्यामुळे आगीचे कारण अधिकाऱ्यांच्या गुलदस्त्यात असल्याचे दिसुन येत आहे़

टॅग्स :DhuleधुळेMayorमहापौर