शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म नियंत्रण झोनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:17 IST

आरोग्य सर्व्हेक्षण सुरू

दोंडाईचा : आरोग्य विभागाचे ३० पथकाकडून केले जातेय् सर्व्हेक्षणलोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : दोंडाईचा शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.गेल्या तीन दिवसात पाच रुग्णांना बाधा झाल्याने दोडाईचा करांच्या चिंतेत भर पडली आहे.दरम्यान कंटेन्मेंट झोन मधील रहिवाशी कुटुंबाचे आरोग्य सर्व्हेक्षण ३० पथकामार्फत सुरू करण्यात आले आहे.दोंडाईचा शहरात तीन दिवसात पाच कोरोना रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण शहरात १४ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरातील डालडा घरकुल, राणीपुरा सुराय नाला परिसर व गोविंद नगर भागातील अंजुम टाकी परिसर असे तीन कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.दोंडाईचात संपूर्ण संचारबंदी असून औषधाचे दुकान आणि दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने व व्यवसाय बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दोंडाईच्यात शुकशुकाट दिसतो. शहरात पोलिसांनी खडा पहारा सुरू ठेवला आहे. शहरातील सर्व सर्व प्रमुख रस्त्यांवर लोखंडी पाईप, दांडया लावून ते सील केले आहेत. सर्व शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोडाईचा नगरपालिकेने कनटेन्मेंट झोन मध्ये फवारणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे चार पथक तयार करण्यात आले आहेत. त्यात डालडा घरकुल, सुराई नाला परिसर व गोविंद नगर, उपजिल्हा रुगणालयाला फवारणी करण्यात आली आहे. या भागात व आवश्यक असलेल्या ठिकाणी पुन्हा फवारणी केली जाणार असल्याचे आरोग्य सभापती मनीषा जितेंद्र गिरासे यांनी सांगितले.दरम्यान कंटेन्मेट क्षेत्रातील कुटुंब सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली आहे. शनिवारी पाच तर रविवारी सात अशा १२ उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवस आरोग्य सर्व्हेक्षण केले.सोमवारी अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्या आदेशाने ३० आरोग्य पथकमार्फत सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली. आरोग्य सर्व्हेक्षणात आरोग्य कर्मचारी,शिक्षक व होमगार्ड अशा १२० जणांचा समावेश आहे. या पथकाला प्रभारी अधिकारी डॉ. अनिल नरोटे व डॉ. सचिन पारख यांनी मार्गदर्शन केले. या पथकाने सोमवारी तीनही कंटेन्मेट झोनमधील १८०० घरांचे सर्व्हेक्षण केले. सलग १४ दिवस हे पथक त्या भागात घरोघरी जाऊन ताप, सर्दी आदींची माहिती घेऊन नोडल आॅफिसरल देतील. संशयास्पद रुग्णाचे परीक्षण आरोग्य पथके करणार असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल नरोटे यांनी दिली.सक्षम प्राधिकरण म्हणून डॉ. दीपक सावंत यांची नेमणूक झाली आहे.कोरोना रुग्णाचा कंटेन्मेट झोनमध्ये प्रवेश व निर्गमण यास बंदी असल्याने या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.े नगरपालिकेचे कर्मचारी सशुल्क जीवनावश्यक वस्तू आणून देतील अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांनी दिली .

टॅग्स :Dhuleधुळे