म्हळसादेवी यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST2021-04-21T04:35:52+5:302021-04-21T04:35:52+5:30

म्हाळसादेवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासह जाऊळ व नवस फेडण्यासाठी ...

Mhalsadevi Yatra canceled | म्हळसादेवी यात्रोत्सव रद्द

म्हळसादेवी यात्रोत्सव रद्द

म्हाळसादेवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासह जाऊळ व नवस फेडण्यासाठी येथे येतात. मात्र, गेल्या वर्षापासून यात्रोत्सव बंद असल्यामुळे अनेक भाविकांच्या जाऊळ व नवसाचे कार्यक्रम रखडलेले आहेत. यात्राकाळात येथे लाखोंची उलाढाल होते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून यात्रा नसल्यामुळे येथील लहान-मोठ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोरोनाचे सावट असल्यामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी घरीच साध्या पद्धतीने कार्यक्रम करावेत. तसेच ज्यांच्या घरी लहान मुलांचे जावळ असतील त्यांनी घरीच आरती लावून जावळ काढावेत व नंतर देवीच्या चरणी अर्पण करावे, असे आवाहन म्हाळसादेवी संस्थानचे अध्यक्ष बन्सीलाल चव्हाण, विश्वस्त किरण गुजराथी यांनी केले आहे.

Web Title: Mhalsadevi Yatra canceled