शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी येथे आज तेली समाजाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

अखिल भारतीय तेली साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त आण्णा क्षीरसागर हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत़ यावेळी माजी ...

अखिल भारतीय तेली साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त आण्णा क्षीरसागर हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत़ यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, विजय चौधरी, विक्रांत चांदवडकर, कृष्णराव हिंगणकर यांच्यासह राज्यातील आजी माजी आमदार, नगराध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर मेळावा व बैठक ७ रोजी सकाळी ११ वाजता संकल्पसिद्धी लॉन्स शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. बैठकीनंतर लगेचच समाजाच्या राजस्तरीय मेळाव्याचे आयोजन येथे करण्यात आले आहे. यात राज्य कार्यकारिणीचे जी.एम.जाधव, सुखदेव वंजारी, श्यामकांत ईशी, डॉ. अरुण भस्मे, बद्रीनाथ लोखंडे, विजय काळे हे उपस्थित राहणार आहेत़ या मेळाव्यासाठी राज्यातील तेली समाज बांधव-भगिनी व प्रांतिक तेली समाज महासभेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत़ या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत ईशी यांनी केले आहे.

शिरपुरात आज सैनिकाचा सत्कार सोहळा

शिरपूर : भारतीय सैन्य दलातील जवान धीरज मधुकरराव सनेर हे १७ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाले़ त्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़

७ रोजी सायंकाळी ५ वाजता येथील सुभाष कॉलनीतील बनुमाय शाळेच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, धुळे जि.प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे़

धीरज सनेर हे गेल्या १७ वर्षांपासून भारतीय सैन्य दलात नोकरीला होते़ ते नुकतेच सेवानिवृत्त झालेत़ त्यानिमित्त सेवापूर्ती व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़ उपस्थित राहण्याचे आवाहन शिव छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, सनेर परिवार, पाटीलवाडा मित्र मंडळ, माजी सैनिक ग्रुप व शिरपूर ग्रीन आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे़

शिरपुरात आज पाटील समाजाचा वधू-वर मेळावा

शिरपूर : सकल मराठा पाटील समाजाच्यावतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़

७ रोजी सकाळी १० वाजता येथील स्वा़ सै़ शंकरनाना लॉन्सच्या मैदानावर हा मेळावा घेण्यात आला आहे़ मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील समाजाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत दामोधर पाटील हे राहणार आहेत़ यावेळी खासदार डॉ़ सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार काशिराम पावरा, जि.प. अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, गटनेता कामराज निकम, सुरतचे प्रकाश पाटील, नगरसेवक मोहन पाटील, शिसाका चेअरमन माधवराव पाटील, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर पाटील, माजी आमदार शरद पाटील, श्याम सनेर, किशोर पाटील, दीपक पाटील, शुभांगी पाटील, संगीता देवरे, अ‍ॅड. ललिता पाटील, सरलाबाई पाटील, कुसुम पाटील, साधना पवार, स्वाती चव्हाण, गुलाबराव पाटील, हेमंत पाटील, संजिवनी सिसोदे आदी उपस्थित राहणार आहेत़

उपस्थित राहण्याचे आवाहन सकल्प चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी व वधू-वर परिचय मेळावा कार्यकारिणी मंडळाने केले आहे़