निर्बंधानंतरही बाजारात गर्दी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST2021-04-16T04:36:36+5:302021-04-16T04:36:36+5:30

सध्या लॉकडाऊन असूनही गुरूवारी भाजीबाजार पंचमुखी कॉर्नर येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. १५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर घालून ...

The market remained crowded despite the restrictions | निर्बंधानंतरही बाजारात गर्दी कायम

निर्बंधानंतरही बाजारात गर्दी कायम

सध्या लॉकडाऊन असूनही गुरूवारी भाजीबाजार पंचमुखी कॉर्नर येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. १५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर घालून दिलेल्या निर्णयाची सर्वत्र पायमल्ली होत असल्याचे दिसून आले. बऱ्याच नागरिकांनी मास्क लावले नव्हते. तसेच भाजीबाजार विक्रेते यांनीही मास्क लावलेले दिसून आले नाही, सोशल डिस्टनसिंग नाही.

पंचमुखी कॉर्नर तसेच गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा बाजार सध्या भरत आहे. संपूर्ण परिसरात बाजार बंद असल्याने नागरिकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कामाव्यतिरिक्त घराबाहेर निघू नका, असे नेते आवाहन करीत असतानाही नागरिक मोठ्या संख्येने बाहेर निघत आहेत. बाजाराची वेळ ही एक वाजेपर्यंत देण्यात आली आहे. बाजारातील वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांनी गर्दीला पांगविले. तसेच काही जणांना प्रसादही दिला.

Web Title: The market remained crowded despite the restrictions