शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानातून मका आणि ज्वारी देण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST

दुसरीकडे शेतकरी लाभार्थींना मात्र रेशनच्या मका, ज्वारीतून वगळण्यात आले आहे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थींना सार्वजनिक ...

दुसरीकडे शेतकरी लाभार्थींना मात्र रेशनच्या मका, ज्वारीतून वगळण्यात आले आहे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थींना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशनच्या अन्नधान्याचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात ४ लाख ६९ हजार ५७६ शिधापत्रिका असून, अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी लाभार्थींना गहू व तांदळाचा लाभ दिला जातो. जानेवारी महिन्यापर्यंत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी ३ किलो गहू २ रुपये प्रतिकिलो दराने व २ किलो तांदूळ ३ रुपये प्रतिकिलो दराने दिला जात होता, तसेच अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड १५ किलो गहू २ रुपये प्रतिकिलो दराने व २० किलो तांदूळ ३ रुपये प्रतिकिलो दराने वितरित करण्यात आला. फेब्रुवारी महिन्याचे वाटप झाले असल्याने हा बदल मार्च महिन्यापासून केला जाणार आहे. प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदय योजनेंतर्गतच्या लाभार्थींचे गव्हाचे प्रमाण ५० टक्‍के कमी करून, त्या ठिकाणी ४० टक्के मका व १० टक्के ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. मका व ज्वारीचा विक्री दर प्रतिकिलो १ रुपया आहे. याचा लाभ जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. या योजनेतून एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना वगळण्यात आल्याने त्यांना रेशनवरील मका व ज्वारी मिळणार नाही.

एक किलोला एक रुपया

मका आणि ज्वारीसाठी लाभार्थींना एक किलोला एक रुपया द्यावा लागणार आहे. यापूर्वी दोन रुपये किलोने गहू व तीन रुपये किलोने तांदूळ दिला जात होता. आता एक रुपये किलोने मका आणि ज्वारीही दिली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थींना दिलासा मिळाला आहे.