शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी, लॉकडाउन उरले फक्त नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 22:01 IST

पिंपळनेर : नागरिकांची चौकांमध्ये गर्दी, दुकाने उघडणाऱ्या २१ जणांना तहसीलदारांनी बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : कोरोना या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाने संचारबंदीबरोबरच लॉकडाउन जाहीर केलेले आहे. पहिल्या टप्यात या दोन्ही गोष्टीचे तंतोतंत पालन करण्यात आले. मात्र लॉकडाउनच्या दुसºया टप्यात मात्र नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याचे चित्र पिंपळनेरमध्ये दिसून येत आहे. लॉकडाउन उठलेला नसतांनाही अनेकांनी दुकाने उघडल्याचे चित्र आहे. तर कुठलेही नियम न पाळता दुकानांवर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे संचारबंदी, लॉकडाउन हे नावालाच उरली असल्याचे येथे दिसून येत आहे.तहसीलदार यांनी दुपारी गावात फिरून २१ दुकानदारांना नोटीसा देऊन कारवाई केली. तर शहरातील पान मसाला हे दुकान सील करण्यात आले त्यानंतर शहरात सर्वत्र बंद झाले.साक्री शहरात रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामपंचायत ग्रामस्तरीय समितीने पाच दिवस कडकडीत बंद पाळीत यशस्वी करून दाखविले. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईदेखील केली. सर्वसामान्य नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पण काही ठिकाणी ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन अत्यावश्यक सुविधा देणाºया दुकानदारांसोबतच काही दुकानदारांनी आपली दुकानेही चोरून लपून सुरू करण्याचा प्रयत्न गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू आहे. दुकानावर नागरिक गर्दी करतात, सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी केली जात नाही. तोंडाला मास्क लावत नाही, दुकानदारांना ही त्यांच्या आरोग्याची व समाजाची चिंता नसल्याचे दिसून येते. शहरात फिरता भाजीपाला विक्रीचा निर्णय असून भाजीपाला पुन्हा गुजरीत सुरू होऊन विक्री होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्स कुठेही दिसत नाही. शहरात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल, तसेच मुख्य बाजारपेठेत मोठी वाहने ये-जा करीत आहेत. कोणी कोणाला बोलत नाही. पोलीसही आता कारवाई करतांना दिसत नाही. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी तसेच घरात थांबत असलेल्या नागरिकांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केली आह. तर अपर तहसील कार्यालय, ग्रामपंचायत व पोलीस स्टेशन या सर्वांनी गावाच्या आरोग्यासाठी समन्वय साधण्याची गरज आहे.शासनाने लॉकडाऊन उठवला नसून नागरिक घराबाहेर मोठ्या प्रमाणात निघत आहे. ज्याला काम नाही तो ही फिरतांना दिसतो. रात्री लोक मोठ्या संख्येने बाहेर फिरण्यासाठी निघतात. यासाठीच पिंपळनेर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गावाचे आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी पिंपळनेर ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा असे सर्वसामान्य नागरिक, कापड विक्रेते यांनी उपसरपंच विजय गांगुर्डे यांच्याकडे बोलून दाखवले व मागणी केली.वरिष्ठ अधिकाºयांनीही या भागाचा दौरा करून ग्रामपंचायत प्रशासन यांच्याशी व संबंधित विभागाला आदेश करावेत तसेच जिल्हा बंदी असून वाहनांची तपासणी करूनच सोडण्याच्या सूचना कराव्यात अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे