शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात आठवेळा लॅाकडाऊन,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST

लाॅकडाऊन जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यातील आठवडी बाजार तसेच चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर शाळा, महाविद्यालयेही बंद करण्यात ...

लाॅकडाऊन जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यातील आठवडी बाजार तसेच चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर शाळा, महाविद्यालयेही बंद करण्यात आली. तसेच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली होती. मात्र २३ रोजी संपूर्ण लाॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प पडले होते. यावेळी स्थलांतरित कामगारांसाठी निवारा उभारण्यात आला. तर शासकीय कर्मचाऱ्यांनाही मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले. लॅाकडाऊनचा २१ दिवसांचा कालावधी ११ एप्रिलला संपला. मात्र संसर्ग वाढत असल्याने, पुन्हा लॅाकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला होता. यानंतर ३१ मे पर्यंत वेळोवेळी लॅाकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला होता. या कालावधीत पेट्रोल पंपही सकाळी सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. लाॅकडाऊन असले तरी खरीप हंगामासाठी शेतीला परवानगी देण्यात आली होती. तसेच बियाणे, खत विक्रीची दुकाने सुरूच होती.

केंद्र सरकारने १ जूनपासून अनलाॅकची प्रक्रिया सुरू केलेली असली तरी मात्र राज्यात अनलॅाक होण्यासाठी २७ जूनपर्यंत वाट पहावी लागली. २७ जून २० पासून मुख्यमंत्र्यांनी ‘मिशन बिगिन’ सुरू केले. त्यानंतर केशकर्तनालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर ३ जुलैपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने व्यापारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले. त्यानंतर ७ जुलैपासून हॅाटेल्स, लॅाज, गेस्ट हाऊस हे ३३ टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाल्याचे वाटून दुकाने सुरू ठेवण्याची वेळ मर्यादा सायंकाळी सहापर्यंत करण्यात आली.

दरम्यान, या कालावधीतही जिल्हावासीयांना १४ वेळा संचारबंदीला सामोरे जावे लागले. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या आठवड्यातच तब्बल ६० तासांचा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला होता.

लॅाकडाऊन, जनता कर्फ्यू यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ते भरून निघणे अशक्यच आहे.