लिंबू, पेरू या पिकांचा विमा योजनेत समावेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:20 AM2019-11-18T11:20:42+5:302019-11-18T11:20:58+5:30

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी

 Lima, Peru crops should be included in the insurance plan | लिंबू, पेरू या पिकांचा विमा योजनेत समावेश करावा

लिंबू, पेरू या पिकांचा विमा योजनेत समावेश करावा

Next

आॅॅनलाइन लोकमत
धुळे : पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा २०१९-२० लागू करण्यात आली आहे. या योजनेत लिंबू व पेरू या पिकांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे.
फळ पिकाचे प्रतिकूल हवामान घटकापासून नुकसान होऊन शेतकºयांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकºयांचे होणारे नुकसान भरून निघावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना लागू केली आहे.
यावर्षी धुळे जिल्ह्यासाठी केळी, आंबा, डाळींब, द्राक्ष या पिकांचा समावेश केला आहे. मात्र लिंबू व पेरू या पिकांचा या योजनेत समावेश केलेला नाही.
२०१८-१९ मध्ये पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेत लिंबू व पेरू या दोन्ही फळ पिकांचा समावेश होता. त्याचा लाभही अनेक शेतकºयांना मिळाला होता.
जिल्ह्यात या दोन्ही फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने, त्यांचा पिक विमा योजनेत समावेश करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title:  Lima, Peru crops should be included in the insurance plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे