शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक वनदिनाच्या पूर्वसंध्येला नील गायीच्या वासरूला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

धुळे : येथून जवळच असलेल्या लळिंग कुरणातून वाट चुकलेले नील गायीचे वासरू धुळे शहरामध्ये काटेरी झुडपांमध्ये अडकले होते. सुज्ञ ...

धुळे : येथून जवळच असलेल्या लळिंग कुरणातून वाट चुकलेले नील गायीचे वासरू धुळे शहरामध्ये काटेरी झुडपांमध्ये अडकले होते. सुज्ञ नागरिकांनी या वासरूची काळजी घेतली. वनविभागाने या वासराला सुखरूप लळिंग कुरणामध्ये सोडून जीवनदान दिले आहे. धुळे शहरात नटराज सिनेमा गृहाजवळच्या परिसरात काटेरी झुडपांमध्ये नील गायीचे वासरू अडकले असल्याचे गणेश शिरसाठ आणि मनोज शिरसाठ या तरुणांच्या निदर्शनाला आले. या वासरूची काटेरी झुडपांमधून सुटका करून त्याला बांधून ठेवले. त्याची काळजीदेखील घेतली. त्यानंतर वनविभागाला याबद्दल माहिती दिली. वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपल्या वाहनातून या वासराला लळिंग कुरणात नेले आणि जंगलात सुखरूप सोडून दिले.

काही वर्षांपूर्वी लळिंग कुरणातूनच वाट चुकलेल्या बिबट्याच्या आठवणी अजूनही धुळेकरांच्या मनामध्ये ताज्या आहेत. धुळे शहरातील जिल्हा कारागृहाच्या शेतशिवारामध्ये बिबट्या आढळून आला होता. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने मोठी धडपड केली. पिंजरे लावले, पिंजऱ्यात एका कुत्र्याला सावज म्हणून ठेवले. बिबट्याने कुत्रा फस्त केला. पण पिंजऱ्यात अडकला नाही. त्यानंतर वनविभागाने फार आटापिटा केला. तरीदेखील बिबट्या हाती का येत नाही हे पाहण्यासाठी जिल्हा कारागृहातील उभं पीक कापून टाकले. त्यावेळी बिबट्याने येथून पोबारा केल्याचे निदर्शनाला आले. हा बिबट्या शहरात कसा आला आणि शहरातून बाहेर कसा गेला, येताना आणि जातानादेखील तो कुणालाच कसा दिसला नाही, अशा अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

नील गायीच्या या वासराला एक प्रकारे जीवदान मिळाले आहे. कारण भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला असता तर कदाचित त्याचा जीवदेखील गेला असता. परंतु जागतिक वनदिनाच्या पूर्वसंध्येला वाट चुकलेल्या नील गायीच्या वासराला सुखरूप जंगलात सोडल्यामुळे वनविभागासह वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नील गायीचे हे वासरू त्याचे कळप शोधण्यात यशस्वी होईल, अशी सर्वांना आशा आहे.