शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वसमार परिसरात बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:54 IST

साक्री तालुका : ग्रामस्थांमध्ये भीती, वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी

म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार परिसरात बिबट्याचा संचार सुरु आहे. बिबट्याच्या हल्यात गेल्या काही दिवसात एक जण जखमीही झाले आहेत. वन विभागाचा याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.गेल्या काही दिवसांपूर्वी वसमार परिसरामध्ये डाबरी शिवारात हिंदळे डोंगरावरती एका डोंगर कपऱ्यात अडकलेल्या बिबट्या बाहेर काढून त्याला लळींग कुरणात सोडण्यात आले होते. त्या घटनेच्या दुसºया दिवशी त्याच ठिकाणी काही अंतरावर हेमराज सोनवणे यांच्या शेतात बिबट्या दिसला. तर तिसºया दिवशी त्याच बिबट्याने हरिष नेरे यांच्यावर हल्ला केला त्यात ते जखमी झाले.लाठया काठयांचा आधारग्रामस्थ शेतात जाताना संरक्षणासाठी लाठ्या हातात घेवून रात्रीच्या वेळी परिसरात वावरताना दिसून येत आहे.कृत्रिम पाणवठे उभारावेदुष्काळी स्थिती व त्यामुळे निर्माण होणारी पाण्याची कमतरता त्यामुळे हिंस्रप्राणी मानवी वस्तीत शिरताना दिसत आहे. याबाबत वनविभागाने तातडीने हिंस्र प्राण्याला पिंजºयात जेरबंद करावे. किंवा जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करावे, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.वीजपुरवठा दिवसा करावारात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत असते. म्हसदी परिसरात वीज पुरवठा रात्री होत असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष द्यावे. आणि वीज पुरवठा हा दिवसा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.डाळिंबाच्या शेतांमध्ये बिबट्याम्हसदी परिसरात व वसमार शिवारात मोठ्या प्रमाणात डाळिंब क्षेत्र असल्याने बिबट्यासह इतर हिंस्र प्राणी येथे वास्तव्य करणे अधिक सोयीचे ठरत असते.माजी सरपंच प्रतिनिधी वेंकट नेरे यांच्या डाळिंब बागेजवळ गुरुवारी बिबट्या दिसला. वसमार पुनर्वसन गावाला लागून शेतकरी विक्रम दगा पाटील नेरे यांच्या शेतामध्येही बिबट्या दिसला. तो अक्कलपाडा धरणाकडे पळाल्याचे सांगण्यात आले. यावेळी वन विभागाचे अधिकारी हे तातडीने दाखल झाले होते.

टॅग्स :Dhuleधुळे