शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा येथील दगडफेक व खुनाचा तपास एलसीबीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 20:38 IST

संवेदनशिल भागात पोलिसांचा बंदोबस्त, आरोपीच्या शोधासाठी पथक नियुक्त

धुळे : अल्पवयीन मुलीची छेडखानी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या जमावाने केलेली दगडफेक, गोळीबारात जखमी झालेल्या युवकाला रुग्णालयात दाखल करताना दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा खून या वेगवेगळ्या प्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. दरम्यान, दोंडाईचा पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक सुनील बाभड यांनी स्विकारला आहे.दोंडाईचा येथील अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. यानंतर त्या दोघांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात येवून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व अन्य पोलिसांवर हल्ला केला. हिंसक झालेल्या जमावाने दगडफेक केली. यात वारे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक डॉ. संतोष लोले, कॉन्स्टेबल संजय चव्हाण, चौधरी, माळी असे पाच कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी वारे यांनी गोळीबार केल्याने यात एकाला दुखापत झाली. गोळीबारातील जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथेही दोन गट समोरासमोर आले. तेथे झालेल्या हाणामारीत शाहबाज शाह गुलाब शाह यांच्या डोक्यात वार केल्याने, त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे गांर्भिर्य लक्षात घेता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह अन्य अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली होती.संवेदनशिल भागात बंदोबस्तघटनेचे गांभिर्य ओळखून धुळ्यासह मुंबई, जळगाव, नाशिक, नंदुरबार येथून पोेलिसांची जादा कुमक मागविण्यात आली असून संवेदनशिल भागात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे.बाभड यांनी घेतला पदभारदोंडाईचा येथे घडलेल्या प्रकरणानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद इतरत्र उमटू नये म्हणून तातडीने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील बाभड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार देखील सोपविला आहे.तपास एलसीबीकडेदोंडाईचा येथे घडलेल्या घटनेचे गांभिर्य ओळखून आणि नि:पक्षपातीपणे तपास होऊन संशयित आरोपींना गजाआड करण्यासाठी या प्रकरणांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे संवेदनशील प्रकरण सांभाळतील.पथकाची नियुक्तीदोंडाईचा पोलीस ठाण्यावर झालेली दगडफेक, पोलिसांवर झालेला हल्ला, शाहबाज शाह यांचा झालेला मृत्यू याप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रकरणनिहाय वेगवेगळे संशयित असून त्यांच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे