कौठळ येथे भूमिगत गटार योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST2021-06-16T04:47:25+5:302021-06-16T04:47:25+5:30

गावातील विविध विकासकामांसाठी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करत जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याला दिलेला शब्द पाळला असून, भविष्यातही जास्तीत ...

Launch of underground sewerage scheme at Kauthal | कौठळ येथे भूमिगत गटार योजनेचा शुभारंभ

कौठळ येथे भूमिगत गटार योजनेचा शुभारंभ

गावातील विविध विकासकामांसाठी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करत जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याला दिलेला शब्द पाळला असून, भविष्यातही जास्तीत जास्त विकासकामे करू, असे प्रतिपादन माजी कृषी सभापती बापू खलाणे यांनी केले.

यावेळी भीमराव बापू पाटील यांचे गल्ली ते बस स्टॅण्डपर्यंत भूमिगत गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य विकास पवार, गटनेते भीमराव बापू पाटील, सरपंच बुधा मोरे, उपसरपंच योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र गुलाब सूर्यवंशी, सुनील मुलचंद मोरे, उषाबाई शांताराम भिल, विजय विनायक पाटील, विनोद शिवाजी पाटील, देवेंद्र भगवान पाटील, जितेंद्र पाटील, शिवाजी कृष्णा सूर्यवंशी, रवींद्र भटू पाटील, विजय दत्तात्रय सूर्यवंशी, मधू मोरे, बारीकराव भाऊराव पाटील, शिवाजी भीमराव पाटील, सुनील अशोक पाटील, सुरेश झिंगा पाटील, विजय अशोक पाटील, श्यामकांत रमेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. गावात अनेक विकासकामे मंजूर झाली असून, त्यापैकी काही कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केेले आहे.

Web Title: Launch of underground sewerage scheme at Kauthal