महिलेच्या बॅगेतून सव्वा लाखांचे दागिने लंपास

By Admin | Updated: April 27, 2017 17:53 IST2017-04-27T17:53:22+5:302017-04-27T17:53:22+5:30

याप्रकरणी दीड महिन्यानंतर धुळे शहर पोलिसात अज्ञात चोरटय़ांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

Lakhs of jewelery worth lakhs of rupees from the woman's bag | महिलेच्या बॅगेतून सव्वा लाखांचे दागिने लंपास

महिलेच्या बॅगेतून सव्वा लाखांचे दागिने लंपास

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 27 - टिटवाळा ते धुळे प्रवासादरम्यान महिलेच्या बॅगेतून अज्ञात चोरटय़ांनी 1 लाख 25 हजारांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी दीड महिन्यानंतर धुळे शहर पोलिसात अज्ञात चोरटय़ांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
ज्योती धनराज गायकवाड (रा़ रूक्मीणी नगर, टिटवाळा जि़ ठाणे) या 11 मार्च रोजी टिटवाळा ते कासारा दरम्यान लोकलने आल्या़ कासारा ते नाशिक टॅक्सीने व नाशिक ते धुळे बसने प्रवास करून मुळ गावी कुमारनगर येथे घरी आल्या़ घरी बॅगेतील साहित्य काढल्यानंतर त्यात ठेवलेले 1 लाख 25 हजार रूपये किंमतीचे सोन्याची दागिने नव्हते. 
याप्रकरणी ज्योती गायकवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: Lakhs of jewelery worth lakhs of rupees from the woman's bag