शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिशचा बहाणा करुन लांबविले २ तोळे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 22:58 IST

संडे अँकर । जिजाई कॉलनीत भरदिवसा घडली घटना, कॉलनीवासिय झाले अवाक, चोरट्यांचा परिसरात शोध सुरु

धुळे : दागिन्यांना पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेला गोड बोलून गंडविले़ तिच्याकडे असलेले सुमारे दोन तोळ्याचे दागिने घेऊन पळून जाण्यात चोरटे यशस्वी झाले़ ही घटना जिजाई कॉलनीत शनिवारी सकाळी साडेदहा ते ११ वाजेच्या सुमारास घडली़ घटनेनंतर कॉलनीवासिय एकवटले होते़ परिसरात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले़ पण, चोरटे हाती लागले नाही़ शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील म्हाडा वसाहतीजवळ जिजाई कॉलनी आहे़ या कॉलनीतील प्लॉट नंबर ३४ मध्ये मिनाक्षी शंकर विभुते यांचे घर आहे़ सकाळी १० वाजेच्या सुमारास दोन जणं दागिन्यांना पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने फिरत होते़ त्यांनी विभुते यांचे घर गाठले़ मिनाक्षी यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली़ तुमच्या समोर आम्ही दागिने पॉलीश करुन देतो अशी बतावणी केली़ असे सांगत मिनाक्षी यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला़ घरबसल्या ते ही अल्पदरात दागिने पॉलिश करुन मिळणार असल्यामुळे या महिलेने त्यां भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याकडील सुमारे दोन तोळे वजनाचे दागिने त्यांच्या स्वाधीन केले़ बोलत असताना त्यांनी एक भांडे आणण्यास सांगितले़ असता  या दोघांनी दागिने लांबविले़ देवपुरातील नकाणे रोडवरील उन्नती नगरात सुध्दा अशा प्रकारची घटना घडली होती़ येथे देखील महिलेचा विश्वास संपादन करुन पॉलीश करुन देण्याचा बहाणा चोरट्यांनी केला़ त्यांच्याकडील दागिने घेऊन पोबारा केला होता़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ त्यांचा देखील शोध लागलेला नाही़ त्यात पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्यामुळे चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे़ कॉलनीवासियांची यानिमित्ताने ‘एकी’!दोन भामटे कॉलनीत फिरत असल्याचे काहींनी पाहिले़ पण, ते असा काही पराक्रम करतील असे कोणाला वाटले नाही़ दागिने घेऊन दोघांनी पोबारा केल्यानंतर महिलेने आरडाओरड केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले़ घटनेनंतर कॉलनीवासिय एकवटले आणि त्यांनी त्या भामट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली़ पण ते मिळून आले नाही़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी