शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णांसाठी कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : येथील जिल्हा रुग्णालय आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालयावरील ताण कमी करण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांकरिता स्वतंत्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : येथील जिल्हा रुग्णालय आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालयावरील ताण कमी करण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांकरिता स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ग्रामीण भागासाठी कुसुंबा, आर्वी आणि बाफना काॅलेजमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. मुकटी आणि सोनगिर येथेही सेंटर सुरू होणार आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाने तीन कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. बाफना कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा हिरे रुग्णालयात दाखल केले जात होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढल्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी गावाजवळ उपचाराची सोय करण्यात आली. त्यानुसार आर्वी आणि कुसुंबा येथे प्रत्येकी ३० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू झाले आहे. तसेच धुळे शहरात बाफना काॅलेजमध्येदेखील ग्रामीण रुग्णांसाठी सेंटर कार्यान्वित होणार आहे. या सेंटरची क्षमता ५०पेक्षा अधिक बेडची असणार आहे.

नव्याने सुरू झालेल्या आणि लवकरच सुरू होणाऱ्या या सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या आणि साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार होणार आहेत. लामकानी येथेही कोविड सेंटर प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सेंटर सुरू झाल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील सरकारी दवाखान्यांवरील ताण कमी होणार आहे. रुग्णांचीही गावाजवळच सोय होईल. शहरात बेडसाठी वेटिंग सुरू आहे.