शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

खान्देश एक्सप्रेस मुंबईसाठी शनिवारपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:50 IST

दोंडाईचा : नंदुरबार मार्गे मुंबईला जाऊ शकणार प्रवासी

दोंडाईचा : सुरत - भुसावळ या रेल्वे मार्गावर मुंबईत बांद्रा येथे जाणारी खान्देश एक्सप्रेस ही नवीन गाडी शनिवारपासून सुरु होणार आहे. या गाडीमुळे शिंदखेडा तालुक्यातील लोकांना थेट मुंबईला जात येणार आहे.भुसावळ हुन जळगांव, अमळनेर, बेटावद , नरडाणा , शिंदखेडा, दोंडाईचा या स्थानका वरून मुंबईत जाण्यासाठी एक गाडी सुरू करावी अशी मागणी होती. त्यानुसार ही एक्सप्रेस गाडी सुरु करण्यात आली आहे. याशिवाय उधना-नंदुरबार व उधना-जळगांव अशा २ नविन रेल्वेही सुरु करण्यात आल्या आहे. त्यासुद्धा शनिवारपासून धावणार आहे.खान्देश एक्सप्रेस रविवार, मंगळवार व गुरुवारी सायंकाळी ५.४० वाजता भुसावळ येथून निघेल. जळगांव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा येथे थांबत दोंडाईचा स्थानकात रात्री ८.४५ वाजता पोहचणार आहे. तेथून नंदुरबार, नवापूर, बारडोली, नवसारी, बलसाड, पालघर, विरार, बोरीवलीमार्गे बांद्रा टर्मिनस (मुंबई) येथे सकाळी पाच वाजता पोहचेल. तसेच बांद्रा टर्मिनस (मुंबई )हून गाडी दर शनीवारी, सोमवारी व बुधवारी रात्री ११.५० वाजता सुटेल व दोंडाईचा येथे सकाळी ८.३० वाजता पोहचेल. प्रवाशांच्या सोयीसाठी खान्देश एक्सप्रेसमध्ये सहा जनरल कोच, चार स्लिपर कोच, दोन ए सी थ्री टायर, एक ए सी फर्स्ट क्लास व गार्ड तसेच पार्सलसाठी २ कोचेस याप्रमाणे एकुण १५ कोचेसची ही गाडी आठवड्यातून तीनदा ये-जा करेल तरी सदर गाडीचे आरक्षण करुन दोंडाईचा रेल्वे स्थानकाच्या उत्पन्नात अधिकाधिक भर घालून लाभ घ्यावा असे आवाहन दोंडाईचा प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे