शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारी मजुरांचा पायी प्रवास शिंदखेड्यात रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 21:26 IST

तपासणीअंती कोरोना ‘निगेटीव्ह’ : १४ दिवसांसाठी केले क्वारंटाईन, सर्व सोयी उपलब्ध

शिंदखेडा : सुरत येथून रेल्वे ट्रॅकच्या माध्यमातून बिहारी मजुरांनी हिम्मत करीत उपाशी पायी प्रवास केल्याची घटना शिंदखेड्यात आल्यानंतर लक्षात आली़ तातडीने त्यांना शिंदखेडा येथील रेल्वे कर्मचारी राहुल मराठे आणि तहसीलदारांमुळे त्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात आली़येथील रेल्वेस्टेशनवर सकाळी ८ वाजेच्या सुमारास अत्यंत दयनीय अवस्थेत पायी १८ ते ३० वयोगटातील बिहार येथील १४ तरुण मजूर अत्यंत दयनीय अवस्थेत येऊन प्लॅटफॉर्मवर बसले होते़ रेल्वे कर्मचारी राहुल मराठे यांच्या लक्षात ही बाब आली़ त्यांनी प्राथमिक चौकशी केली असता त्यांना काहीएक माहिती देता येत नव्हती़ त्यांची विचारपूस केली असता ते सुरत येथे एका कंपनीत कामाला होते़ मात्र लॉकडाउनमुळे कंपनी बंद पडली व त्यांना तेथून जाण्यास सांगितले़ त्यांनी कसे बसे भाड्याच्या घरात काही दिवस काढले व घरमालकांनीही ११ एप्रिल रोजी घरातून काढून दिल्याने त्यांनी बिहारमध्ये पायी जाण्याचा निर्णय केला व १२ तारखेपासून रेल्वे ट्रॅकने पायी शुक्रवारी सहाव्या दिवशी शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर पोहचले़ या बाबत मराठे यांनी चौकशी केली असता ते पाच दिवसापासून उपाशी असून चालून चालून पाय ही सुजले होते़ शिवाय ते खूप घाबरले होते़ त्यांना कोणी मारेल आणि पोलिसांकडे देतील, अशी भीती त्यांच्या मनात होती़ मात्र मराठे यांनी त्यांची सर्व कहाणी ऐकून सर्व मजूर बिहार राज्याचे असल्याने खासदार डॉ़ सुभाष भामरे यांच्याशी संपर्क साधला़ डॉ़ भामरे यांनी शिंदखेडा तहसीलदार यांना सर्व सांगितले असता तहसीलदार साहेबराव सोनवणे लगेच सहकाऱ्यांसह शिंदखेडा रेल्वेस्टेशनवर पोहचले़ सर्व मजुरांना एका खासगी वाहनाने शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांना कोरोनाची कोणतीच प्राथमिक लक्षणे नसल्याने त्यांना १४ दिवसांसाठी डॉक्टरांच्या देखरेख खाली जिल्हा परिषदेची शाळा क्रमांक ५ मध्ये ४ खोलीत राहण्याची, झोपण्याची व जेवणाची व आंघोळीची सर्व सोय करुन दिल्यामुळे सर्व मजूर समाधानी दिसून आले़ दरम्यान, तहसीलदार यांनी याठिकाणी २ शिक्षकांना नियुक्त केलेले आहे़तहसीलदार सोनवणे यांनी तरुण मजुरांच्या राहण्यासह खाण्या-पिण्याची सोय करुन दिल्यामुळे सर्वांच्या डोळ्यात पाणी आले़ तुम्ही सांगाल तितके दिवस आनंदाने राहू अशी ग्वाही त्यांनी दिली़

टॅग्स :Dhuleधुळे