शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचा व्यापारी दागिन्यांसह जेरबंद तिघा चोरट्यांचाही मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 19:32 IST

शिरपूर परिसरातील चोरी उघड : ४ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त

धुळे : शिरपूरसह परिसरात चोरी केल्यानंतर लपून बसणे, वारंवार ठिकाण बदलणे यामुळे चोरटे पोलिसांना सापडत नव्हते़ अशातच धुळ्यानजिक तिखी तलावाजवळ तीन जण लपून बसले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या़ त्याचवेळेस चोरीचे सोने विकत घेऊन जळगावच्या दिशेने निघालेल्या व्यापाऱ्याला पारोळा चौफुलीवर पकडण्यात पोलिसांना यश आले़ त्यांच्याकडून ४ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले़मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील मोहाला येथील काही लोकं धुळे जिल्ह्यातील शेतावर जागल्याचे काम करतात़ त्यांच्याकडे त्यांचे काही नातेवाईक पाहुणे म्हणून येतात, चोरी करुन निघून जातात़ मोहाला येथील दोघांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने शिरपूर तालुक्यातील करवंद, वाघाडी आणि अर्थे गावात घरफोडी केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली़ पण, चोरट्यांना सुगावा लागल्याने ते पळून जाण्यात यशस्वी ठरले़ धुळे तालुक्यातील नरव्हाळ येथील एक शेताजवळील तिखी तलावालगत तीन जण लपून बसल्याची माहिती बुधवंत यांना मिळताच त्यांच्यासह उपनिरीक्षक हनुमान उगले, हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, रफिक पठाण, श्रीकांत पाटील, महेंद्र कापुरे, कर्मचारी प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, गौतम सपकाळे, उमेश पाटील, रविकिरण राठोड, विशाल पाटील, किशोर पाटील, तुषार पारधी, मयूर पाटील, योगेश जगताप, दीपक पाटील, कैलास महाजन यांनी सापळा लावून पाठलाग करुन तिघांच्या मुसक्या आवळल्या़ पोलिसांनी जतन रुमसिंग मोरे (२१), कुंवरसिंग सुरसिंग मोरे (२२) आणि लालसिंग रेन्या तडवी (२०) (तिघेही रा़ मोहाला ता़ सेंधवा जि़ बडवानी) यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच दागिने, मोटारसायकल काढून दिले आहे़ त्यांनी चोरीचे सोने हे सोनू उर्फ जितेंद्र अशोक सोनार (३०, रा़ मेहरुण, ता़ जळगाव) याला विकल्याचे सांगितले़ त्याचा शोध घेतला असता पारोळा चौफुलीवरच पकडण्यात आले़ त्याच्याकडून ४ लाख ८७ हजार ५२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़२०१८ मध्ये धुळे तालुक्यातील नेर येथे जैन मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला होता़ ही चोरी केल्याची कबुली संशयित जतन रुमसिंग मोरे याने दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिली़ दरम्यान, पकडण्यात आलेल्या चौघा आरोपींना शिरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे