जैताणेच्या महिलेचा मृतदेह सापडला

By Admin | Updated: September 20, 2015 01:10 IST2015-09-20T01:10:36+5:302015-09-20T01:10:36+5:30

पुरात वाहून मृत्यू : आखाडे गावाजवळ

Jaitane woman's body found | जैताणेच्या महिलेचा मृतदेह सापडला

जैताणेच्या महिलेचा मृतदेह सापडला

निजामपूर : जैताणे येथील भिल्ल वस्तीत राहणा:या सीताबाई भावसिंग पवार (वय 60) या वृद्धेचा मृतदेह आखाडे गावाजवळ आज मिळाला.

रोहिणी नदीला शुक्रवारी पूर आला होता. त्यात सीताबाई पवार या वाहून गेल्या होत्या. शोध घेऊनही त्यांचा तपास लागू शकला नव्हता. तसेच नदीला मोठा पूर असल्याने तपासाला मर्यादाही पडल्या. अखेर शनिवारी दुपारी त्यांचा मृतदेह आखाडे गावाजवळ मिळाला.

याप्रकरणी भावसिंग रामसिंग पवार (62) जैताणे यांनी येथील पोलिसांत खबर दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार जगताप करीत आहेत.

Web Title: Jaitane woman's body found