जैन सोशल ग्रुप प्लाटिनमला बेस्ट प्रेसिडेंशिअल पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST2021-04-05T04:32:12+5:302021-04-05T04:32:12+5:30

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जैन सोशल ग्रुप प्लाटिनमच्या महिला पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशन, बस स्थानक, पेट्रोल पंप, भाजीपाला ...

Jain Social Group Platinumla Best Presidential Award | जैन सोशल ग्रुप प्लाटिनमला बेस्ट प्रेसिडेंशिअल पुरस्कार

जैन सोशल ग्रुप प्लाटिनमला बेस्ट प्रेसिडेंशिअल पुरस्कार

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जैन सोशल ग्रुप प्लाटिनमच्या महिला पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशन, बस स्थानक, पेट्रोल पंप, भाजीपाला विक्रेत्या तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला. महिलांसाठी भव्य कर्करोग निदान शिबिराचे आयोजन केले. १०० पेक्षा अधिक महिलांची मॅमोग्राफी, पॅप स्मिअर या महाग तपासण्या अमरावतीहून बोलावलेल्या मॅमोग्राफी रुग्णवाहिकेमध्ये मोफत करण्यात आल्या. स्वातंत्र्यदिनी आयोजित रंग दे तिरंगा फेस्टिव्हलला १५०० पेक्षा अधिक धुळेकरांनी प्रतिसाद दिला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. वीरपत्नी अरुणा राऊत, भारती सूर्यवंशी यांचा सन्मान झाला. यासह अन्नदान, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, वह्या वाटप, गणवेश वाटप, जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र रिजनचे अध्यक्ष राजेंद्र धोका यांना ५१ हजार रुपयांचा पूरग्रस्त निधी दिला. दिव्यांगांना तीनचाकी सायकलींचे वाटप केले. कोरोना काळात ११ हजाराचा कोरोना फंड दिला तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतही भरघोस मदत केली. २०० पेक्षा अधिक आदिवासी गरजू कुटुंबांना किराणा वाटप केला. पायी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना १ हजार अन्न पाकिटे आणि पाण्याचे वाटप केले. सदस्यांना कोरोना किटचे वाटप केले. महावीर जयंती निमित्त मातोश्री वृध्दाश्रम, आनंद मतिमंद, संस्कार मतिमंद शाळेत मिष्टान्न भोजन वाटप आणि गरीब मुलांना १०० पेक्षा अधिक कपड्यांचे वाटप केले. या सर्व सामाजिक कार्याची दखल घेत जेएसजी प्लाटिनमला बेस्ट प्रेसिडेंशिअल पुरस्कार बहाल करण्यात आला. धुळे प्लाटिनमच्या संपूर्ण टीमचे काैतुक होत आहे.

Web Title: Jain Social Group Platinumla Best Presidential Award