शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

दिलेली जबाबदारी चोख बजावणे हे कर्तव्यच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:46 IST

न्या.एस.एल. वैद्य : शिंदखेडा येथे आयोजित कायदेविषयक शिबिरप्रसंगी प्रतिपादन

शिंदखेडा : अधिकारी, कर्मचारी यांना दिलेली जबाबदारी त्यांनी चोख बजावणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. जर आपण जबाबदारीने काम केले तर न्यायालयावरील भार कमी होईल, असे मत येथील न्यायालयाचे न्यायाधीश एस. एल. वैद्य यांनी गुरूवारी येथील तहसील कार्यालयात आयोजित कायदेविषयक शिबिरप्रसंगी व्यक्त केले.त्यांच्या अध्यक्षतेत हे शिबिर घेण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार साहेबराव सोनवणे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.एम.बी. मराठे, सचिव अ‍ॅड.हर्षल अहिरराव, बी. व्ही. सोनवणे, बी.झेड. मराठे, व्ही.एल. पाटील, पी. सी. जाधव, व्ही.एस. वाघ, मिलिंद सोनवणे, शारदा मराठे, प्रतीक्षा मराठे, ज्योत्स्ना पारधी आदी उपस्थित होते.तालुका विधी सेवा समितीमार्फत ९ ते २३ नोव्हेंबर या दरम्यान विधी सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत गुरूवारी दुपारी २ वाजता विधी सेवा समिती व येथील तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सभागृहात कायदेविषयक शिबीर घेण्यात आले.न्या.वैद्य पुढे म्हणाले की आपापली कामे जबाबदारीने पूर्ण केले तर कोणत्याच नागरिकाला न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाण्याची गरज पडणार नाही. पर्यायाने न्यायालयांवरील भार या मुळे कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तहसीलदार सोनवणे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर बाबी समजण्यासाठी हे कायदेविषयक शिबीर आयोजित केले आहे. त्याचा निश्चितच सर्वांना फायदा होईल, असेही ते म्हणाले. अ‍ॅड.व्ही.एस. वाघ यांनी जमीन महसूल कायदा १९६६ या विषयावर तर अ‍ॅड.वसंत पाटील यांनी भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन केले,कार्यक्रम यशस्वी त्यासाठी न्यायालयीन सहाययक अधीक्षक एस.पी. खर्चे, कनिष्ठ लिपिक नंदकिशोर मिस्तरी, अजय मेटकर, रणजित चौधरी, लक्ष्मण चौधरी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.एच.बी. अहिरराव यांनी केले तर आभार अ‍ॅड. बुधा सोनवणे यांनी मानले.या शिबिरासाठी शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त झाले.

टॅग्स :Dhuleधुळे