शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पाटचारीचे पाणी अखेर पोहोचले शेतांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:30 IST

कनोली प्रकल्प : रब्बी पिकांना मिळणार जीवदान, शेकडो शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील कनोली मध्यम प्रकल्पाच्या पाटचारी क्रमांक तीनचे पाणी अखेर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचल्याने रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे़ त्यामुळे विंचूर, तरवाडे, नाणे, सिताणे येथील शेकडो शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ १५ तारखेपर्यंत पाटचारी तीनचे पाणी सुरू राहणार आहे़ त्यामुळे शेतकºयांनी अधिकृतरित्या मागणी नोंदवावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे़गेल्या आठवड्यात कनोली प्रकल्पाच्या पाण्याचा वाद चिघळला होता़ ४६ वर्षांपूर्वी आकारास आलेल्या या कनोली प्रकल्पातील पाणी पाटचाºयांमध्ये सोडण्यासाठी मोठी तांत्रिक अडचण आहे़ एका पाटचारीत पाणी सोडण्यासाठी दुसरी पाटचारी बंद करावी लागते़ पाटचारी तीनमध्ये पाणी सोडण्यासाठी पाटचारी एकचे पाणी बंद करावे लागते़ परंतु पाणी बंद करण्यासा पाटचारी एकवरील बोरकुंड आणि नंदाळे येथील शेतकºयांनी विरोध केला होता़ प्रसंगी पाटचारीवरच आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता़ दुसरीकडे पाण्याअभावी पिके करपू लागल्याने पाटचारी तीनवरील शेतकºयांनी देखील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात आक्रमक आंदोलन करुन आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता़ या संपूर्ण प्रकरणात धुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची गोची झाली होती़ यावर तोडगा काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी पोलिस बंदोबस्तात सहा तारखेला पाटचारी एकचे पाणी बंद करुन पाटचारी तीनमध्ये पाणी सोडले़ त्यामुळे येथील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़शुक्रवारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाटचारी एक बंद करण्यासाठी गेले त्यावेळी काही शेतकºयांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला़ परंतु पोलिस कर्मचाºयांनी खाक्या दाखवताच त्यांनी माघार घेतली़ पाटचारी एक बंद करण्याची आणि पाटचारी तीनमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडली़दरम्यान, पाटचारी एक आणि दोनच्या शेतकºयांनी परस्पर गेट उघडून पाणी चोरण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे़अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठी स्थानिक शेतकºयांची पाणीवापर संस्था सुरू झाली पाहिजे़ परंतु गेल्या चार वर्षांपासून पाऊस न झाल्यामुळे प्रकल्पात ठणठणाट होता़ त्यामुळे संस्था स्थापण्याचा उत्सुकता नाही़

टॅग्स :Dhuleधुळे