निवासी डॉक्टरांवर कोविडसह शिक्षणाचा वाढतोय ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST2021-03-31T04:36:31+5:302021-03-31T04:36:31+5:30

कोरोनाचा कहर गेल्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला होता. टप्प्या-टप्प्याने या आजाराने शहरासह जिल्ह्यातच नाही, तर जिल्ह्याच्या सीमेलगत ...

Increasing stress on education with resident doctors | निवासी डॉक्टरांवर कोविडसह शिक्षणाचा वाढतोय ताण

निवासी डॉक्टरांवर कोविडसह शिक्षणाचा वाढतोय ताण

कोरोनाचा कहर गेल्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला होता. टप्प्या-टप्प्याने या आजाराने शहरासह जिल्ह्यातच नाही, तर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गावांमध्येही शिरकाव केला. सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांचा आजही शासकीय रुग्णालयांकडे ओढा असतो. परिणामी वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता विद्यमान डॉक्टरांवर कामांचा ताण येणे स्वाभाविक आहे. कठीण काळ आणि डॉक्टरांची संख्या लक्षात घेता जे शिक्षण घेणारे भावी डॉक्टर आहेत, त्यांचीदेखील मोठ्या प्रमाणावर मदत घेतली जात आहे. त्यांच्याकडून रुग्ण तपासणीचे काम करून घेतले जात असल्यामुळे साहजिकच त्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विद्यार्थी असल्यामुळे त्यांना मर्यादा येतात आणि याच मर्यादेची देखील आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या शिक्षणावर कोणत्याही प्रकारचा परिणाम नको व्हायला, अशी दिनचर्या असायला हवी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

प्रतिक्रिया

१) रुग्णांची देखभाल करणे, त्यांची तपासणी करणे हे जरी आमचे काम आज जरी नसले तरी भविष्यात राहणार आहे याची आम्हाला जाणीव आहे; पण सद्या आम्ही शिक्षण घेत असल्यामुळे आम्हाला त्यातून सूट हवी.

- विद्यार्थी डॉक्टर

२) रुग्ण तपासणी करीत असताना त्याचा परिणाम आमच्या अभ्यासावर होत आहे. जे शिक्षण आम्ही घेत आहोत, त्याकडेच लक्ष द्यायला हवे. तसे काहीअंशी होताना दिसत नसल्यामुळे ताण वाढत आहे. याकडे लक्ष द्यायला हवे.

- विद्यार्थिनी डॉक्टर

३) रुग्णांची देखभाल, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमचे परम कर्तव्य आहे. हे जरी खरे असले तरी आमचा अभ्यासदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. याची जाणीव यंत्रणेने ठेवायला हवी, एवढीच अपेक्षा.

- विद्यार्थी डॉक्टर

(चौकटसाठी)

निवासी डॉक्टरांसह शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे असले तरी त्यात आरोग्य यंत्रणेने देखील योग्य त्या प्रमाणावर दखल घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी डॉक्टरांना कोणत्याही प्रकारची सक्ती करता कामा नये. कारण त्यांना शिक्षणाचा देखील ताण असतो, हे आरोग्य यंत्रणेने लक्षात घ्यायला हवे; पण तसे काही होताना दिसत नाही. हे कुठेतरी थांबवायला हवे.

Web Title: Increasing stress on education with resident doctors