आयुर्वेद महाविद्यालय बोराडी येथे गर्भोत्सव संस्कार शिबिराचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:39 AM2021-09-27T04:39:42+5:302021-09-27T04:39:42+5:30

शिबिराचे नियोजन प्रसूतीतंत्र व स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. राहुल कामडे यांनी केले. गायत्री शक्तिपीठ, शिरपूर येथून आलेल्या सेवाभावी दीदींनी शिबिर ...

Inauguration of Garbhotsav Sanskar Shibir at Ayurveda College Boradi | आयुर्वेद महाविद्यालय बोराडी येथे गर्भोत्सव संस्कार शिबिराचे उद्घाटन

आयुर्वेद महाविद्यालय बोराडी येथे गर्भोत्सव संस्कार शिबिराचे उद्घाटन

Next

शिबिराचे नियोजन प्रसूतीतंत्र व स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. राहुल कामडे यांनी केले. गायत्री शक्तिपीठ, शिरपूर येथून आलेल्या सेवाभावी दीदींनी शिबिर यशस्वी केले. ऋषिसंस्कृतीनुसार गर्भिणी स्रीयांनी यज्ञ करून आपल्या गर्भातील शिशुवर उत्तम संस्कार कसे करता येतात याबद्दल मार्गदर्शन रेखा भगत यांनी केले. नीलिमा ठाकूर यांनी यज्ञाचे संपूर्ण कर्मकांड केले. त्यांना सुनंदा भावसार, निर्मला चौधरी, ज्योती चौधरी यांनी सहकार्य केले. बोराडी गावातील १४ गर्भिणींनी या पहिल्या शिबिराचा लाभ घेतला. आता दर महिन्याला एकदा शिबिर आयोजित करण्याचा संकल्प आहे. आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मागील आठवडाभर श्रम केलेत. तसेच परिसरातील आशा कार्यकर्त्यांनी गर्भिणींच्या घरापर्यंत जाऊन शिबिराची प्रसिद्धी केली.

Web Title: Inauguration of Garbhotsav Sanskar Shibir at Ayurveda College Boradi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app