‘हरघर गोठे, घरघर गोठे’ योजना राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 09:06 PM2020-07-07T21:06:51+5:302020-07-07T21:07:10+5:30

कृषी समिती सभापती : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

Implement ‘Harghar Gothe, Gharghar Gothe’ scheme | ‘हरघर गोठे, घरघर गोठे’ योजना राबवा

dhule

Next

धुळे : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘हरघर गोठा, घरघर गोठा’ ही नवीन योजना त्वरीत राबवावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी, पुशसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामकृष्ण खलाणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे़
कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमध्ये रोजगार निर्मिती व्हावी यासाठी गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि कोंबडी पालन करणाºया शेतकºयांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला गोठा तयार करण्यासाठी शंभर टक्के अनुदान देण्याची नवीन नवीन योजना त्वरीत सुरू करणे आवश्यक असल्याने कृषी सभापतींनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांना निवेदन दिले़
निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘हरघर गोठे, घरघर गोठे’ या योजनेची आधीच घोषणा केली आहे़ राज्यात केंद्र पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि राज्य पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे़ गायी आणि म्हशींसाठी गोठ्याचे शेड बांधण्यासाठी राज्य पुरस्कृत रोजगार हमी योजनेतून प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची योजना सध्या सुरू आहे़ आता केंद्र पुरस्कृत रोजगार हमी योजनेतून गोठ्यांचे सिमेंट काँक्रीटचे पक्के तळ, गव्हाण आणि मूत्रसंचय टाकी यासाठी ३५ हजार रुपयांचे वेगळे अनुदान मिळणार आहे़ या योजनेत पुणे जिल्हा परिषदेने दोन प्रकार केले आहेत़ शेडसह गोठा बांधकामासाठी ७० हजार रुपये आणि शेडविरहित गोठ्यासाठी ३५ हजार रुपये दिले जाणार आहेत़
या योजनेची धुळे जिल्ह्यातही त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी कृषी सभापतींनी केली आहे़

Web Title: Implement ‘Harghar Gothe, Gharghar Gothe’ scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे