शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना व्हाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:35 IST

निवेदनात म्हटले आहे की, पिंपळनेर येथील १०० बेडचे नियोजित कोविड केअर सेंटर तातडीने कार्यान्वित करून त्यात ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज ...

निवेदनात म्हटले आहे की, पिंपळनेर येथील १०० बेडचे नियोजित कोविड केअर सेंटर तातडीने कार्यान्वित करून त्यात ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज नसलेल्या, पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे तातडीने संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे. परिसरातील सर्व शासकीय आश्रमशाळांच्या इमारती ताब्यात घेऊन प्रत्येक प्रा. आ. केंद्रानुसार ५०/१०० बेडचे विलगीकरण कक्ष तातडीने उभे करण्यात यावे व मनुष्यबळासाठी परिसरातील सामाजिक संस्थांची मदत घेण्यात यावी.

गृहविलगीकरणास परवानगी दिलेल्या रुग्णांच्या घरी तशी व्यवस्था आहे का? याची तपासणी स्थानिक ग्रामपंचायत व महसूल यंत्रणेमार्फत करण्यात यावी व त्याच्या कुटुंबीयांची तातडीने अँटिजेन टेस्ट करण्यात यावी, गृहविलगीकरणात असलेले रुग्ण व त्यांचे कुटुंबीय जर १४ दिवसांच्या आत बाहेर फिरताना, नोकरीवर अथवा व्यवसाय करताना आढळल्यास अशा बेजबाबदार लोकांवर तातडीने पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करण्यात यावेत व याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच यासंदर्भात नागरिकांना तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा.

टेंभा प्रा. आ. केंद्रांतर्गत येणारे शहरातील आरोग्य उपकेंद्रांवर इदगाहपाडा, इंदिरानगर, खडक्यापाडा तातडीने लसीकरण केंद्र चालू करण्यात यावेत. ज्यामुळे ग्रामीण रुग्णालय, पिंपळनेर येथील लसीकरण केंद्रावरील अतिरिक्त ताण कमी होऊन वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यास मदत होईल.

ग्रामीण रुग्णालय, पिंपळनेरमार्फत शहरातील खासगी कोविड सेंटर्समध्ये उपचार घेणाऱ्या गंभीर व गरजू रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात यावीत व यासाठी आरटीपीसीआरसह सीटी स्कॅन रिपोर्ट ग्राह्य धरण्यात यावा.

पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात होणारा मृत्युदर कमी होण्यासाठी ठोस प्रयत्न व्हावेत, तसेच तिथे मृत्यू झाल्यानंतर होणारी मृतदेहाची पॅकिंग रुग्ण ॲडमिट असलेल्या कक्षात न करता त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून शेजारील इतर बेडवरील रुग्णांना मानसिक धक्का बसणार नाही.