शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मोबदला लवकर न मिळाल्यास धरणाचे काम बंद पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST

शिंदखेडा सोंडले शिवारातील जामफळ प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील मोबदला मिळावा, यासाठी भारतीय किसान संघ व संघर्ष समिती यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी ...

शिंदखेडा सोंडले शिवारातील जामफळ प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील मोबदला मिळावा, यासाठी भारतीय किसान संघ व संघर्ष समिती यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी जामफळ धरण परिसरात महिनाभर कामबंद आंदोलन केले. या काळात आंदोलक शेतकऱ्यांची प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी भेट दिली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निवाड्याची मुदत असल्याचे सांगत, त्याच्या आधी निवाडा जाहीर करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. यानंतर, शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले होते, परंतु दोन महिने उलटले, तरी ही प्रशासनाकडून निवाडा जाहीर करण्यास विलंब होत आहे. जामफळ प्रकल्पात एक हजार दोनशे एकर जमीन बुडिताखाली जात असून, ४५० शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना वडिलोपार्जित जमिनीचा बाजारभावाप्रमाणे चारपट मोबदला मिळण्यासाठी मार्च महिन्यात कामबंद आंदोलन करीत असताना, प्रशासनाने नुसते आश्वासन दिले. वास्तविक, सोंडले शिवारातील ५०० हेक्टरच्या भूसंपादनाचा २५९ कोटीचा निवाडा १२ ॲागस्ट, २०२०ला भूसंपादन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला होता. आता प्रशासनाने २१ जून, २०२१ ही निवाड्याची अंतिम तारीख जाहीर केली आहे. तोपर्यंत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबचंद जैन, जामफळ संघर्ष समितीचे संजय येवले, यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे, तसेच जामफळ प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकरी, संघर्ष समितीचे अध्यक्ष केदारेश्वर मोरे, दंगल बापू धनगर, संजय परदेशी, प्रकाश परदेशी, आर.के. माळी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रमोद डेरे, आर.झेड. महाजन, पराग देशमुख, भटू धनगर, चेतन चौधरी, धनश्याम गुजर, शाम माळी, अनिल पाटील, मोहनसिंग परदेशी, संजय माळी, गोविंदा ठेलारी, सुकदेव ठेलारी, दुला ठेलारी, मदनलाल गुजर, हरीदास बडगुजर, कपील परदेशी, संजय पाटील, यांचेसह इतर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.