शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस सोनिया सेठी निवडणूक निरीक्षक जिल्हाधिकारी : भेटण्याची वेळ दुपारी १२ ते १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 21:57 IST

धुळे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे - नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोनिया सेठी (भा. प्र. ...

धुळे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोनिया सेठी (भा. प्र. से.) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने या पोट निवडणूकच्या उर्वरीत कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक म्हणून सोनिया सेठी यांची नेमणूक केलेली आहे. त्या गुलमोहोर शासकीय विश्राम गृह (संतोषी माता मंदिराजवळ, धुळे) येथे वास्तव्यास असून, त्यांचा संपर्क क्रमांक ९५४५९७९४२३ हा आहे. या निवडणुकीसंदर्भातील कामकाजासाठी अथवा उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधींना भेटीसाठी दुपारी १२  ते १ वाजेपावेतो जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे उपलब्ध राहतील. याची सर्व उमेदवार, सर्व मतदार तसेच जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन  निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी केले आहे.मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे.तत्कालीन सीईओआयएएस सोनिया सेठी या धुळे जिल्ह्यासाठी नविन नाहीत. त्या धुळे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तर त्यांचे पती संजय सेठी देखील त्याच वेळी धुळ्याचे जिल्हाधिकारी होते. या अधिकारी दाम्पत्याच्या प्रशासकीय सेवेचा धुळे जिल्ह्याला लाभ झाला होता. 

टॅग्स :Dhuleधुळे