शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे आगारातून जळगाव, औरंगाबाद, नाशिक मार्गावर दर तासाला बस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 13:10 IST

प्रवाशांचा वाढता प्रतिसाद बघून घेतला निर्णय

आॅनलाइन लोकमतधुळे : अनलॉकच्या पाचव्या टप्यात आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली असून, गेल्या महिन्याभरात प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद बघता आता धुळे आगारातून जळगाव, नाशिक, व औरंगाबाद मार्गावर दर तासाला बस धावणार असल्याचे धुळे आगार प्रमुखांनी कळविले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने २२ मार्चपासून महामंडळाची बससेवा बंद होती. त्यानंतर २३ मे रोजी जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली. मात्र या बससेवेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. तर २० आॅगस्टपासून आंतरजिल्हा बस सुरू झालेली आहे.आंतरजिल्हा बससेवा सुरू झाली तरी सुरवातीला प्रत्येक आसनावर एकाच प्रवाशाला बसण्याची परवानगी होती. मात्र नंतर उत्पन्न कमी मिळत असल्याने राज्य शासनाने पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला मर्यादीत स्वरूपात लांब पल्याच्या बसेस धावत होत्या. मात्र आता प्रवाशांचा प्रतिसाद व आगामी सण उत्सव लक्षात घेता बसफेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली आहे. धुळे आगारातून जळगाव, नाशिक, औरंगाबाद मार्गावर आता प्रत्येक तासाला बस धावणार आहे. यात जळगाव व औरंगाबादसाठी सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ४ पर्यंत तर नाशिकसाठी सकाळी ५.३० वाजेपासून सायंकाळी ७ पर्यंत प्रत्येक तासाला बस सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख अनुजा दुसाने सोनार यांनी कळविले आहे.पुण्यासाठी फेºया वाढवल्यादरम्यान पुणे मार्गावर सुरवातीला एकच बस धावत होती. मात्र आता सकाळी ६३०, ८, १० व दुपारी १२ व २.३० व रात्री ८वाजता बसेस धुळे आगारातून सोडण्यात येत आहे. याशिवाय चोपडा, यावल, रावेर या मार्गावर बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.मध्यप्रदेशसाठी अजुनही प्रतीक्षाधुळे आगारातून अद्यापही मध्यप्रदेशसाठी बससेवा सुरू झालेली नाही. सध्या नाशिक-इंदूर ही एकमेव बस धावत आहे. मात्र मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसेस महाराष्टÑात येऊ लागल्या आहेत. त्याचप्रमाणे येथूनही इंदूर, बºहाणपूरसाठी बसेस सुरू कराव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे