धुळ्यातील गिंदोडिया मैदानावर रविवारी होणार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 18:33 IST2019-02-15T18:33:09+5:302019-02-15T18:33:33+5:30

हिंदू जनजागृती समिती : उपस्थितीचे आवाहन

Gundodiya ground in Dhule will be held on Sunday | धुळ्यातील गिंदोडिया मैदानावर रविवारी होणार सभा

धुळ्यातील गिंदोडिया मैदानावर रविवारी होणार सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : हिंदू जनजागृती समितीच्यावतीने धुळ्यातील गिंदोडीया मैदानावर रविवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी दिली़ 
हिंदूच्या मंदिरावरील आक्रमणे, गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही सर्रासपणे चालू असलेल्या गोहत्या, लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू युवती पळवून नेण्याचे व धर्मांतरीत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ हिंदूवर होणारे अन्याय अत्याचार यांना वाचा फोडणे तसेच धर्मशिक्षण, धर्माचरण, धर्मरक्षण याद्वारे हिंदूना संघटीत करणे आणि हिंदू राष्ट्र स्थापनेची पायाभरणी करणे यासाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने देशभरात हिंदू राष्ट्र जागृती सभांचे आयोजन केले जात आहे़ त्याचाच एक भाग म्हणून ही सभा धुळ्यात आयोजित करण्यात आली आहे़ 
हिंदू जनजागृती समितीसह सनातन संस्था गेल्या १६ वर्षापासून राष्ट्ररक्षण, धर्मजागृती यासाठी अखंड कार्यरत असून आजवर समितीच्यावतीने देशभरात यशस्वीपणे सभांचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे नंदकुमार जाधव यांनी सांगितले़ पंकज बागुल यांनी सांगितले, सभेच्या प्रचारात धुळ्यातील युवा वर्ग उत्साहात सहभागी होत आहेत़ हिंदू जनजागृती समितीच्या रागेश्री देशपांडे म्हणाल्या, रविवारी होणाºया सभेचा २५ हून अधिक गावात प्रसार आणि प्रचार झाला आहे़ 
यांचे होईल मार्गदर्शन
रविवारी होणाºया सभेला गोरक्षक तथा श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष राजासिंह ठाकूर यांच्यासह समितीचे प्रशांत जुवेकर, सनातनचे सदगुरु नंदकुमार जाधव, समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत़ 

Web Title: Gundodiya ground in Dhule will be held on Sunday

टॅग्स :Dhuleधुळे