अफगणिस्तानमधून पार्सल आल्याचे आमिष दाखवत शिक्षकाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 10:18 PM2021-01-22T22:18:10+5:302021-01-22T22:18:30+5:30

वारंवार घडताय फसवणुकीचे प्रकार : वेगवेगळ्या कारणासाठी वर्ग केले पैसे

Ganda to a teacher showing the lure of a parcel from Afghanistan | अफगणिस्तानमधून पार्सल आल्याचे आमिष दाखवत शिक्षकाला गंडा

अफगणिस्तानमधून पार्सल आल्याचे आमिष दाखवत शिक्षकाला गंडा

Next

धुळे - मी सैन्य दलात असून अफगणिस्तान येथे मोठे घबाड सापडले आहे. माज्या हिश्यातून ३० टक्के रक्कम पाठविते असे एका महिलेने आमिष दाखविले. दुसऱ्या महिलेने मुंबई येथून बोलत असल्याचे सांगत पार्सल आल्याचे सांगत ते सोडविण्यासाठी पैशांचे आमिष दाखवून ३ लाख २७ हजार रुपयांचा गंडा एका शिक्षकाला घातल्याची घटना देवपुरात घडली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात २१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल झाला.
देवपुरातील स्टेडियमच्या पलिकडे नागाई हॉस्पिटलच्या मागे गुरव हौसिंग सोसायटीत राहणारे संजय शेनपडू देसले (४७) या शिक्षकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, इलियास मॅकेली नावाने मोबाईल फोनच्या ईमेलवर वेळोवेळी चॅटींग करुन मी अफगणिस्तानमध्ये सैन्य दलात भरती झाल्याचे सांगितले. आम्हाला अफगणिस्तान येथे मोठे घबाड सापडले आहे. त्यात माज्या हिश्याला ४.३ मिलीयन डॉलर मिळालेले आहे. मी तुम्हाला मला मिळालेल्या हिश्यातून ३० टक्के रक्कम पाठविते असे एका महिलेने फोनवरुन सांगितले. त्यासाठी बॉक्स कुरियर केल्याच्या पावतीचा फोटो आणि त्यात नोटांचे बंडल पॅक करतानाचा व्हाडीओ ईमेलवर पाठविण्यात आला. हा सर्व प्रकार १३ आॅगस्ट २०२० ते १५ आॅक्टोबर २०२० या कालावधीत घडला. यानंतर मुंबई येथून बोलत असल्याची बतावणी गरिमा देशमुख या महिलेने करत तुमच्या नावाने अफगणिस्तान येथून एक पार्सल आले असल्याचे सांगितले. ते सोडविण्यासाठी वेगवेगळ्या कारणासाठी पैशांची आमिष दाखवत ३ लाख २७ हजार रुपये बँकेत भरणा करण्यासाठी भाग पाडले.
आपली काहीतरी फसगत होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संजय देसले या शिक्षकाने सायबर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना आपबिती कथन केली. त्यानुसार, २१ जानेवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Ganda to a teacher showing the lure of a parcel from Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे