शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

फुटलेल्या बंधाऱ्यांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:39 IST

भात नदीचे पाणी वाहून चालले : पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी एकमेव जलस्त्रोत

तिसगाव-ढंडाणे : नगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया तिसगाव येथील भात नदीवर जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे दोन बंधारे फुटून महिना उलटला आहे. मात्र या प्रकरणी साधी चौकशी करण्याचे सौजन्यही या विभागाने आतापर्यंत दाखविलेले नाही. महिनाभरापासून नदीतील पाणी अक्षरश: वाहून जात आहे. या संपूर्ण परिसरात या बंधाऱ्यांव्यतिरिक्त एकही जलस्त्रोत नाही. त्यामुळे पुढील काळात पिण्यासाठी तसेच शेतीच्या सिंचनासाठी पाणी कोठून उपलब्ध होणार, असा यक्ष प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा आहे.या परिसरात गेल्या दीड-दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि आता नदीतील हे सर्व पाणी डोळ्यादेखत वाहून जात असल्याने परिसरातील जुन्या जाणत्या ते तरुण शेतकºयापर्यंत सारेच अस्वस्थ आहेत. लघुसिंचन विभागाने आता वेळ न दवडता या बंधाºयांचे बांधकाम करून वाहून जाणारे पाणी कसे अडविता येईल, यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.भात नदीवरील टकाºया वस्तीवर असलेले व तिसगाव आणि ढंडाने या दोन्ही गावांच्या वरच्या बाजूस असलेल्या या बंधाºयांवर आजूबाजूला असलेल्या सुमारे ४० ते ५० विहिरी अवलंबून आहे. त्यामुळे शेकडो एकर क्षेत्र भिजते. एकीकडे या परिसरातील शेतकºयांनी गेल्या दुष्काळ परिस्थितीत पाण्यासाठी खूप भटकंती केली आहे. मग ती पिण्याच्या पाण्यासाठी किंवा शेतीसाठी असेल, अशा सर्व परिस्थितीमुळे शेतकरी व ग्रामस्थ त्यात होरपळून निघाले होते. त्यामुळे त्यांना पाणी व जलस्त्रोताचे महत्त्व निश्चित कळलेले आहे. पण ज्यांच्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे त्या संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनीच याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे.२०१६-१७ मध्ये जलयुक्त योजनेंतर्गत येथील साठवण बंधाºयाची दुरुस्ती व खोलीकरण कामाचा प्रस्ताव होता. परंतु संबंधित अधिकाºयांनी दुसरीकडेच काम पूर्ण केले. जेथे काम केले तो परिसर या लघुसिंंचन विभागाच्या अखत्यारीतही येत नाही, असे शेतकरी छोटू साहेबराव पाटील, छोटू हटकर, दीपक पाटील, अनिल लांडगे, विशाल भामरे, नामदेव भिल, डोंगर पाटील, युवराज भगत, सुभाष नामदेव पाटील, बापू भामरे, जितेंद्र सुदाम पाटील, सुनील पाटील, भानुदास पाटील आदींनी सांगितले. पाणी पूर्णपणे वाहून जाण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्रा येथील शेतकरी, ग्रामस्थांनी घेतला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे