शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक, तीन जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:06 IST

पंचाळे ता. सिन्नर येथील शेतकरी विवेक भागवत थाेरात याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

धुळे : सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील शेतकऱ्याची जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याची तक्रार धुळे शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणी धुळ्यातील दोघांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

पंचाळे ता. सिन्नर येथील शेतकरी विवेक भागवत थाेरात याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, मे २०१२ मध्ये धुळ्यातील निरंजन भतवाल (रा. मालेगाव रोड, धुळे), आसिफ बशीरोद्दीन पिंजारी (रा. मुस्लीम नगर, चाळीसगाव रोड, धुळे) आणि त्यांच्या गावातील धनंजय कमलाकर थोरात (रा. पंचाळे, ता. सिन्नर) या तिघा संशयितांनी त्यांच्याशी जमिनीचा व्यवहार केला. पंचाळे कोळपेवाडी रोडलगत असलेली गट नंबर ३३१ ही १ हेक्टर ४१ आर ही शेतजमीन खरेदी करण्याचा व्यवहार झाला होता. एकूण ९५ हजार रुपये देण्याचे त्यांच्यात ठरले होते. त्यापैकी केवळ २० हजार रुपये दिले. उर्वरित ७५ हजार रुपये मिळत नसल्याने विवेक थोरात यांनी तगादा लावला असता त्यांना वेळोवेळी धनादेश देण्यात आले. तसेच अन्य ठिकाणी जमिनी देण्याचे सांगण्यात आले. अशातच ५ वर्षे गेली. त्यांनी दिलेले धनादेश वटत नसल्याने व व्यवहारातील मोठी रक्कम अडकून पडलेली असल्याने त्यांनी तगादा लावला असता २०१७ नंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता. व्यवहारानंतरही जमीन अद्याप विवेक थोरात यांच्याकडे असल्याने व त्यांना दुसरा व्यवहारदेखील करता येत नसल्याने या प्रकाराचा सोक्षमोक्ष लागावा म्हणून त्यांनी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, धुळ्यातील निरंजन भतवाल, आसिफ पिंजारी या दोघांसह पंचाळे येथील धनंजय थोरात या तिघांविरुद्ध भादंवि कलम १२० ब, ४२० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.