शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

साक्री तालुक्यात गाैण खनिजाची चार वाहने पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयात गठित केलेल्या जिल्हास्तरीय गाैण खनिज पथकाने साक्री तालुक्यात शनिवारी चार वाहने पकडून तहसिल कार्यालयात जप्त ...

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयात गठित केलेल्या जिल्हास्तरीय गाैण खनिज पथकाने साक्री तालुक्यात शनिवारी चार वाहने पकडून तहसिल कार्यालयात जप्त केली आहेत.जिल्हास्तरीय गाैण खनिज भरारी पथकाचे प्रमुख तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी सांगितले की, गुजरात राज्यातून उपसा केलेली वाळू मालेगाव, सटाणा आदी ठिकाणी नेली जात असल्याचे भासवून साक्री तालुक्यातील भामेर येथे वाळु विक्री करण्याचा घाट घातला हाेता. परंतु पथकाने केलेल्या चाैकशीत वाळु चोरी सिध्द झाल्याने वाळुची दोन अवजड वाहने भामेर ता. साक्री येथे पकडली. शनिवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारासह ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, याच पथकाने दुपारी ३ वाजता अंबापूर ता. साक्री गावात दोन ट्रॅक्टर पकडले. या दोन्ही ट्रॅक्टरमधून गाैण खनिजाची चोरटी वाहतूक केली जात होती. एका ट्रॅक्टरमध्ये मुरुम होते तर दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये दगड होते. दोन्ही ट्रॅक्टर साक्री तहसिल कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.

जिल्हास्तरीय गाैण खनिज पथकाचे प्रमुख किशोर घोडके यांच्यासह पंजाबराव साळुंखे, किसन चाैधरी हे दोन पोलीस कर्मचारी,चालक रवींद्र भदाणे यांनी ही कारवाई केली. जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांकडून नियमानुसार दंड वसूल केला जाणार आहे.