शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा टाकण्यापूर्वीच चार दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:40 IST

कुंडाणे फाटा : एक संशयित फरार

धुळे : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाºया चौघांना धुळे तालुका पोलिसांच्या गस्ती पथकाने धुळे तालुक्यातील कुंडाणे (वार) शिवारातून रंगेहात पकडले़ ही घटना रविवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली़ यातील एक जण मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे़ गेल्या काही दिवसांपासून चोºया आणि घरफोड्यांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु आहे़ या अनुषंगाने रात्रीच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्राप्त झाल्याने शहरासह जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा पुरती कामाला लागली आहे़ धुळे तालुका पोलीस ठाण्याचे रात्रीचे गस्ती पथक नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर फिरत होते़ धुळे तालुक्यातील कुंडाणे वार या भागात असताना काही तरुण संशयितरित्या फिरत असल्याचे लक्षात आले़ त्यांना थांबविण्यात येऊन त्यांची चौकशी करण्यात आली़ ही घटना रविवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली़ दरोड घालण्याची त्यांची तयारी असल्याचा संशय घेऊन त्यांच्याकडील असलेल्या साहित्याची तपासणी केली असता लोखंडी टॅमी, सळई, चाकू, लाकडी दांडा, दोरखंड, मिरचीची पूड आणि विना नंबरची दुचाकी त्यांच्याकडे आढळून आली़ या पाचही जणांना पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतले़ पण, अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला़ या सर्वांना धुळे तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले़ पोलीस कर्मचारी सुमीत चव्हाण यांनी रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, चेतन सुनील शेलार (२१), महेश उर्फ महेंद्र रविंद्र पाटील (२१), उमेश शालिंदर वाघ (२०), तुषार दादाभाई वाघ (२०) (सर्व रा़ कुंडाणे (वार) ता़ धुळे) या संशयितांविरुध्द भादंवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ पळून गेलेल्याचा शोध सुरु आहे़ पोलीस उपनिरीक्षक एस़ ए़ भोरकडे घटनेचा तपास करीत आहेत़ या सर्व संशयितांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता २७ नोव्हेंपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी