छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 10:53 PM2020-02-19T22:53:17+5:302020-02-19T22:53:46+5:30

प्रकाश पाठक : डॉ़ शितल मालुसरे यांच्या उपस्थितीत शिवचरित्र व्याख्यानमालेचा समारोप

Follow the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करा

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : चारित्र्यसंपन्न, वाईट घटना विरहीत, सुसंस्कृत, एकात्मतेचा समाज निर्मित करायचा असेल तर घराघरातून, मनामनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचे अनुकरण, संवर्धन, रक्षण, पालन व शिकवण झाली पाहिजे, असे सांगत अप्रिय घटना रोखायच्या असतील तर तंत्रज्ञानासह छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अभ्यासा, अंगिकारा असे आवाहन शिवव्याख्याते प्रकाश पाठक यांनी तरुणांना केले़
एसएसव्हीपीएस संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नॉर्थ पॉइंट शाळेच्या प्रांगणात आयोजित शिवचरित्र व्याख्यानमालेत ‘छत्रपती शिवाजी महाराज चारित्र्याचा महामेरू’ या विषयावर तिसरे आणि शेवटचे पुष्प गुंफताना ते बोलत होते़
व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रोहिदास पाटील होते़ प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पी़ पी़ पाटील, सिनेट सदस्य दिलीप रामू पाटील, डॉ़ संध्या पाटील, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, डॉ़ भाईदास पाटील, सुभाष देवरे, प्रफुल्ल पाटील, एस़ टी़ पाटील, गुणवंत देवरे, उत्कर्ष पाटील, शिवाजी पाटील, प्रदीप नवसारे, जी़ डी़ पाटील, एस़ एऩ नंदन उपस्थित होते़
तानाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशज डॉ़ शितल मालुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमालेचा समारोप झाला़ सुरूवातीला एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तानाजी मालुसरेंचा पराक्रम या छोटेखानी नाट्याचे सादरीकरण केले़ तत्पूर्वी सकाळी संस्थेच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी धुळे शहरात चित्ररथ मिरवणूक काढली़ या मिरवणुकीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले़ व्याख्यानमालेच्या ठिकाणी एसएसव्हीपीएच्या चित्रकला महाविद्यालयाने आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनाने लक्ष वेधून घेतले़ वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रथम आलेली नॉर्थ पॉइंट शाळेची विद्यार्थीनी गौरी संदीप पाटील हीला पारितोषिक देवून गौरविण्यात आले़ संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़

Web Title: Follow the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे