धुळ्यात अग्नितांडवात पाच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 03:47 IST2017-03-27T03:47:12+5:302017-03-27T03:47:12+5:30

शनिवारी मध्यरात्रीनंतर शॉर्टसर्किटने घराला लागलेल्या आगीत येथील मारुती मंदिराचे पुजारी राम शर्मा यांच्या कुटुंबावर

Five dead in a fire fighting in Dhule | धुळ्यात अग्नितांडवात पाच ठार

धुळ्यात अग्नितांडवात पाच ठार

धुळे : शनिवारी मध्यरात्रीनंतर शॉर्टसर्किटने घराला लागलेल्या आगीत येथील मारुती मंदिराचे पुजारी राम शर्मा यांच्या कुटुंबावर काळाने झडप घातली. दुर्घटनेत झोपेत असलेल्या शर्मा कुटुंबातील सर्व पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यात शर्मा, त्यांची वृद्ध आई, पत्नी व दोन मुलांचा समावेश आहे.
शहरातील पाचकंदिल परिसरात धनादाळ नामक गल्लीत शनिवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता राम शर्मा यांच्या घराला आग लागली. त्यात शोभाबाई छाजुलाल शर्मा (७०), राम छाजुलाल शर्मा (४०), जयश्री राम शर्मा (३५), राधे राम शर्मा (१२) व साई राम शर्मा (१०) यांचा दुर्दैवी अंत झाला. शर्मा यांच्या दुमजली घराला आग लागल्याचे मध्यरात्री काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या बंबांनी अथक प्रयत्नांनी सुमारे तासाभराने आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत शर्मा कुटुंबातील पाचही सदस्यांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. राम शर्मा यांच्या पश्चात चार भाऊ व एक बहीण असा परिवार आहे़ रविवारी शर्मा कुटुंबीयांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Five dead in a fire fighting in Dhule