शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
3
"माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
4
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
5
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
6
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
7
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
8
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
9
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
10
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
11
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
12
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
13
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
14
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
16
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
17
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
18
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
19
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
20
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वादग्रस्त महापरीक्षा पोर्टल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 14:55 IST

विद्यार्थ्यांनी केले निर्णयाचे स्वागत : उमटल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तत्कालिन शासनाने सुरु केलेले महापरीक्षा आॅनलाईन पोर्टल वादग्रस्त ठरले होते़ परिणामी विद्यमान शासनाने ही परीक्षा पध्तद बंद करण्याचा निर्णय घेताच परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत़शासनाने वादग्रस्त महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील भरती प्रक्रिया विभागस्तरावर घेतली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करताच तात्काळ महापरीक्षा पोर्टलला स्थगिती दिली होती़ तसेच ते बंद करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरु झाल्या होत्या. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रसिक खडसे यांनी तसे संकेत दिले होते. विविध विभागातील रिक्त पदांच्या आरक्षण पडताळणीचे काम सध्या सुरु आहे. ७२ हजार पदांची भरती पोर्टल मार्फत न घेता विभाग स्तरावर घेण्यात येणार आहे. आता महाभरती पोर्टलद्वारे होणार नाही़ याबाबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मते ‘लोकमत’ने जाणून घेतली़विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. भरती प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीने राबवावी व लवकर भरती प्रक्रिया सुरु करावी असे मत देखील त्यांनी व्यक्त केले़विधानसभा निवडणुकीत महापरीक्षा पोर्टलचा मुद्दा तरुणाईने लावून धरला होता. सत्तेत आलो तर वादग्रस्त पोर्टल तात्काळ बंद करु असे आश्वासन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दिले होते. मोठ्या राजकीय नाट्यमय घटनेनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. उद्धव ठाकरे यांनी सूत्रे सांभाळल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी लगेच महापरीक्षा पोर्टल बंद करण्याबाबत ट्विट केले होते़ तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पोर्टल बंद करण्याची मागणी केली होती. शासनाने सर्व प्रथम पोर्टलला स्थगिती दिली होती व विद्यार्थ्यांचे अभिप्राय मागवण्यात आले होते. महापरीक्षा पोर्टल बंद करावे अशा प्रकारचे अभिप्राय बहुतांश विद्यार्थ्यांकडून शासनाला प्राप्त झाले होते. विद्यार्थ्यांकडून होणाºया प्रचंड विरोधानंतर महापरीक्षा पोर्टल अखेर बंद करण्यात आले़

टॅग्स :Dhuleधुळे