बारापत्थर चौकात गाडीच्या व्यवहारावरुन हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 21:25 IST2021-03-31T21:25:48+5:302021-03-31T21:25:57+5:30

धारदार शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा

Fighting over vehicle dealing at Barapathar Chowk | बारापत्थर चौकात गाडीच्या व्यवहारावरुन हाणामारी

बारापत्थर चौकात गाडीच्या व्यवहारावरुन हाणामारी

धुळे : शहरातील बारापत्थर चौकात सोमवारी झालेल्या हाणामारी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका गटातर्फे फिर्याद देण्यात आली आहे. दुचाकीच्या व्यवहारात पैसे देण्यावरुन झालेल्या वादातून धारदार शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत जावेदखान नईमखान पठाण (४०, गल्ली नंबर १, महापालिका शाळा क्रमांक ८ समोर, बारा पत्थर, धुळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर वाद झाला. रिझवी ऊर्फ बंटी जमील अहमद यास राहुल माळी आणि नंदन बंग यांनी मोटारसायकल विकली होती. त्या व्यवहारातील उर्वरित रकमेवरुन रिझवी यांच्याशी दोघांचा वाद झाला. या वादातून रिझवीला शिवीगाळ करुन हाताबुक्क्याने मारहाण केली जात असल्याने जावेदखान नईमखान पठाण हा आर. के. स्पेअर पार्ट दुकान तेथे गेला आणि भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी बुलेटवरुन आलेल्या तिघांनी शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एकाने काहीतरी धारदार शस्त्राने वार करुन जबर जखमी करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावरुन नंदन बंग, भावेश पाटील, बबलू बडगुजर, यश हेकर, तेजस बडगुजर, सनी चव्हाण, राहुल माळी (कोणाचे पूर्ण नाव माहीत नाही) (सर्व रा. जुने धुळे) यांच्याविरोधात भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Fighting over vehicle dealing at Barapathar Chowk